Tarun Bharat

भारत-पाकच्या काश्मीर वादावर चीनने दिला सल्ला,चीनच्या सल्ल्यावर भारताचे प्रत्युत्तर

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरवरून वाद सुरु आहे. तर केंद्र सरकारने भारताला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देऊन कलम ३७० हटवले. त्याला तीन वर्षे झालीत. तरीदेखील पाकिस्तान सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. काश्मीरप्रश्नाबाबत जगातील इतर देश पाठिंबा देतील किंवा न देतील, पण चीन नक्की आपल्या बाजूने राहील, अशी पक्की खात्री पाकिस्तानला आहे. मात्र चीनने आपली भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानच्या आशेवर पाणी ओतले आहे. चीनने काश्मीर बाबत बोलताना, भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा, असे आवाहन चीनने केले आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केले. भारतीय संविधानाच्या कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारत सरकारने त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

चीनच्या आवाहनाला भारताचे प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरशी संबंधित प्रश्न हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मार्चमध्ये म्हटले होते की, ‘चीनसह इतर कोणत्याही देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

भारत अन् फ्रान्स यांच्यात चर्चा

Patil_p

आयएईएसोबतचा इराणचा करार संपुष्टात

Patil_p

9 पाकिस्तानी सैनिकांचा पीओकेमध्ये अपघाती मृत्यू

Patil_p

कोरोनापॉझिटिव्ह वधूकडून उदाहरण प्रस्थापित

Patil_p

तालिबानकडून पाकिस्तानला मोठा झटका

Patil_p

तिसऱया लाटेमुळे फ्रान्स ‘लॉकडाऊन’

Patil_p
error: Content is protected !!