Tarun Bharat

भारत…जगाची फार्मसी !

देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रचंड मोठी झेप घेणाऱयांपैकी एक क्षेत्र म्हणजे भारतीय औषध उद्योग…देशांतर्गत बाजारपेठ आज जवळपास 1.67 ट्रिलियन रुपये आकाराची बनलीय अन् यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त जागा व्यापलीय ती स्थानिक पातळीवर उत्पादित औषधांनी…गेल्या काही दशकांमध्ये भारत एकेक पायरी वर चढत गेला असून आता विश्वातील पहिल्या तीन औषध निर्मात्यांमध्ये जाऊन बसलाय…आपण जगभरातील 200 देशांना ‘फार्मा’ उत्पादनांचा पुरवठा करतोय. जेनेरिक औषधं आणि लसींचे प्रमुख निर्यातदार यांच्या जोरावर आपण प्रतिमा निर्माण केलीय ती ‘जगाच्या फार्मसी’ची…

भारतीय औषधनिर्मिती उद्योग हा जागतिक फार्मास्युटिकल क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावत असून औषध उत्पादनांच्या आघाडीवर संख्येचा विचार करता विश्वात आपण तिसऱया, तर मूल्यानुसार 14 व्या क्रमांकावर आहोत…भारत हा ‘जेनेरिक औषधां’चा सर्वांत मोठा निर्माता. संख्येचा विचार केल्यास त्यांच्या जागतिक पुरवठय़ामध्ये देशाचा वाटा 20 टक्के…खेरीज बाजारपेठेत 60 टक्के हिश्श्यासह जागतिक स्तरावरील अग्रगण्य लस उत्पादक म्हणून देखील आपल्याकडे पाहिलं जातंय. ‘कोव्हिड’वरील लसींनी हे स्थान आणखी मजबूत करण्याचं काम इमाने इतबारे केलंय…

s 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत औषध बाजारपेठ 2021 मध्ये 41 अब्ज डॉलर्स इतकी होती आणि 2024 पर्यंत ती 65 अब्ज डॉलर्सवर, तर 2030 पर्यंत 130 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज…

s 2020-21 मध्ये औषधांच्या निर्यातीत सुमारे 24 टक्के इतकी वाढ झाली. याला कारणीभूत राहिली ती कोव्हिड-19 महामारी. त्याचा फटका बसलेल्या 150 हून अधिक देशांना महत्त्वाच्या नि इतर औषधांचा पुरवठा करण्यात आला…

s आर्थिक वर्ष 2021-22 मध्येही औषध निर्यातीची कामगिरी मजबूत राहिली. जागतिक व्यापारातील व्यत्यय आणि ‘कोव्हिड-19’शी संबंधित उपचारांच्या मागणीत घट झालेली असून सुद्धा वाढ कायम राहिलीय हे विशेष…एप्रिल ते ऑक्टोबर, 2022 दरम्यान औषधांची निर्यात 2019-20 म्हणजेच महामारीपूर्व कालखंडाशी तुलना केल्यास 22 टक्क्यांनी जास्त राहिलीय…

s या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीतही वृद्धी झालीय…‘फार्मा क्षेत्रा’तील ‘एफडीआय’ सप्टेंबर 2022 पर्यंतच्या पाच वर्षांत चार पटींनी वाढून जवळपास 70 कोटी डॉलर्सवर पोहोचलीय. गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं अन् उद्योगाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावलीय…

2022 मधील स्थिती…

s भारताची औषध बाजारपेठ एका अहवालानुसार, 2021 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढून 1.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचलीय. औषधांची संख्या फारशी वाढली नसली, तरी किमतींमध्ये वृद्धी झाल्याचा हा परिणाम…

s 2021 मध्ये या उद्योगानं 14.9 टक्क्यांची वाढ नोंदविली. त्यास कारणीभूत राहिला तो कोविड-19 चा उत्पात नि ‘गॅस्ट्रोइंटेस्टायनल’ तसंच श्वसनविकार, वेदना, ताप यावरील अन् संसर्गविरोधी औषधं, जीवनसत्त्वं यांनी आलेली मागणी…

s सर्वांत मोठा थेरपी विभाग असलेल्या आणि बाजारात 13 टक्क्यांचा वाटा उचलणाऱया ‘कार्डिएक’ विभागानं 8 टक्क्यांच्या वृद्धीसह 23 हजार 561 कोटी रुपयांची विक्री नोंदवलीय…

s 2021 मध्ये ‘अँटीबायोटिक्स’, ‘अँटीफंगल’ यांसारख्या ‘अँटी-इन्फेक्टिव्ह्स’ची विक्री 25 टक्क्यांनी वाढली होती, ती 5 टक्क्यांनी घसरलीय. संसर्गविरोधी औषधांच्या विक्रीचं प्रमाणही घटलेलं असलं, तरी ही घसरण केवळ 1 टक्क्याची. गेल्या वर्षी 22 हजार 531 कोटी रुपयांच्या विक्रीसह ’अँटी-इन्फेक्टिव्ह’ हा दुसरा सर्वांत मोठा विभाग राहिला…

s तिसरा क्रमांक लागतो तो ‘गॅस्ट्रोइंटेस्टायनल’ विभागाचा. त्याच्या विक्रीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली, परंतु औषधांची संख्या वधारली नाही…

sा मधुमेहविरोधी औषधांच्या बाजाराच्या मूल्यामध्ये 6 टक्के, तर संख्येत 1 टक्का वाढ दिसून आलीय…भारतात 90 हून अधिक कंपन्या 1 हजार 600 हून जास्त मधुमेहावरील औषधांची विविध नावांनी विक्री करतात. याउलट ‘स्ट्रेप्टोमायसिन’ हे क्षयरोगासाठी अत्यंत आवश्यक असलेलं ‘जेनेरिक’ औषध केवळ फारच कमी आस्थापनांकडून उत्पादित केलं जातंय…

s बाजारात वाढ 19 टक्के आणि संख्येत वृद्धी 12.4 टक्के यासह श्वसन विभाग सहाव्या क्रमांकावर पोहोचलेला असून या औषधांची बाजारपेठ 14,428 कोटींची…

औषधांच्या विश्वात कोण आघाडीवर ?...

2017 ते 2022 पर्यंतच्या कालावधीचं विश्लेषण केल्यास विख्यात औषध कंपन्यांच्या बाजारमूल्यात आमूलाग्र बदल झालाय…‘ल्युपिन’, ‘झायडस’, ‘ग्लेनमार्क’सारख्या ‘बिग प्लेयर्स’वर पाळी आलीय ती आपला क्रमांक गमावण्याची, तर ‘डिव्हीस’ (490 टक्के वृद्धी), ‘टॉरेंट फार्मा’ आणि ‘लॉरस’ (405 टक्के वाढ) यांनी मान मिळविलाय तो गुंतवणूकदारांचं गळय़ातील ताईत बनण्याचा…मूळ यादीतील स्थान टिकविणारं एकमेव आस्थापन म्हणजे ‘सन फार्मा’. त्यांनी 2017 पासून पहिल्या क्रमांकावर बसण्याचा पराक्रम सातत्यानं बजावलाय (2 लाख कोटी रुपयांहून जास्त बाजारमूल्य असलेली भारतातील ती एकमेव औषध कंपनी). पहिल्या पाच स्थानांत ‘सिप्ला’ अन् ‘डॉ. रेड्डीस्’ यांनीही पुन्हा एकदा जागा मिळविलीय…

2017 चा विचार केल्यास त्यात सर्वांत पाच मौल्यवान कंपन्यांत समावेश होता तो ‘सन फार्मा’, ‘ल्युपिन’, ‘सिप्ला’, ‘डॉ. रेड्डीस्’ आणि ‘झायडस लाईफ सायन्सेस’ यांचा…गेल्या साठ महिन्यांतील सर्वांत मोठा धक्का म्हणजे ‘ल्युपिन’नं गमावलेला दुसरा क्रमांक. ती कंपनी चक्क 11 व्या स्थानावर पोहोचलीय…‘झायडस’नं सुद्धा चौथा क्रमांक गमावलेला असून त्यांना समाधान मानावं लागलंय ते आठव्या स्थानावर. पहिल्या दहापैकी एक आसन काबिज करणाऱया ‘ग्लेनमार्क’वर पाळी आलीय ती आपला क्रमांक घालवून बसण्याची…

याउलट वरच्या दिशेनं झेपावलीय ती हैदराबादची ‘डिव्हीस लॅब्स’ व अहमदाबादची ‘टॉरेंट फार्मा’. त्यांनी अनुक्रमे तिसरं व सहावं स्थान मिळविलंय…स्थानिक ‘फॉर्म्युलेशन फर्म’ ‘आयपीसीए’, ‘एपीआय’ची निर्मिती करणारी ‘लॉरस लॅब्स’, स्थानिक ‘फॉर्म्युलेशन फर्म’ ‘जेबी केमिकल्स’ (403 टक्के वृद्धी) यांनीही जबरदस्त प्रगती दाखविलेली असून ‘लॉरस लॅब्स’ अन् ‘जेबी केमिकल्स’ यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना चार पटींनी परतावा दिलाय…

‘सिप्ला’, ‘डॉ. रेड्डीस्’ अन् ‘टॉरेंट फार्मा’ यांनी सर्वांत जास्त सातत्यपूर्ण ‘प्लेयर्स’ म्हणून स्थान मिळविलंय आणि यादीतील क्रमांकांना निसटण्याची संधी दिलेली नाहीये…पैशांनी उडी मारलीय ती ‘एपीआय’ तसंच खास व उत्कृष्ट औषधांची निर्मिती करणाऱया कंपन्यांवर. त्याशिवाय साऱयांचं लक्ष सध्या केंद्रीत झालंय ते चीनला शह देण्याची क्षमता दाखविणाऱया आस्थापनांवर. खेरीज अन्य एक महत्त्वाची बाब ठरलीय ती ‘कोव्हिड’च्या काळात बाजारपेठेतील आपलं स्थान कायम राखणाऱया कंपन्यांच्या क्षमतेची…

विशेष म्हणजे ‘सन फार्मा’नं डॉक्टरांनी लिहिलेल्या ‘प्रीस्किप्शन’च्या विश्वात सुद्धा पहिलं स्थान प्राप्त केलंय…हा मान प्रथमच मिळविणाऱया ‘सन’नं मात केलीय ती गेल्या बऱयाच वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर बसलेल्या ‘मॅनकाइंड फार्मा’वर…‘सन फार्मा’ला भक्कम आधार मिळतोय तो तो तब्बल 12 हजार कर्मचाऱयांचा. शिवाय आस्थापनानं लक्ष केंद्रीत केलंय ते ‘कार्डिओव्हेस्क्युलर’, ‘मधुमेह’, ‘न्युरो’ अन् ‘गॅस्ट्रोएंटरोलॉजी’ या प्रमुख ‘थेरेपीं’वर…‘सन’शिवाय यादीत स्थान मिळविणाऱयांमध्ये ‘मॅनकाईंड’, ‘अल्कॅम’, ‘सिप्ला’ आणि ‘ऍबॉट’ यांचा समावेश होतो…

आघाडीच्या पाच कंपन्या (फेब्रुवारी, 2023 नुसार)...

कंपनीसध्याचा क्रमांक2019 चा क्रमांक2017 चा क्रमांकबाजारमूल्य (रुपयांत)
सन फार्मा1112.46 लाख कोटी
डिव्हीस341176573 कोटी
सिप्ला25382571 कोटी
डॉ. रेड्डीस्42572569 कोटी
टॉरेंट फार्मा69851857 कोटी

भारतीय फार्मा उद्योगातील महत्त्वाची अधिग्रहणं व विलिनीकरणं

वर्षविकलेली कंपनीअधिग्रहण करणारं आस्थापनकराराचा आकार
2014रॅनबॅक्सीसन फार्मा4122 दशलक्ष डॉलर्स
2010पिरामल हेल्थकेअरऍबॉट3720 दशलक्ष डॉलर्स
2008रॅनबॅक्सीदायिची सांक्यो2238 दशलक्ष डॉलर्स
2013ऍगिला स्पेशलिटीसमायलन1600 दशलक्ष डॉलर्स
2016ग्लेन फार्माफॉसन1091 दशक्ष डॉलर्स
2022सुवेन फार्माऍडव्हंट762 दशलक्ष डॉलर्स (करार पूर्ण झाल्यानंतर किंमत वाढणार)
2015फॅमिकेअर्स युनिटमायलन750 दशलक्ष डॉलर्स
2010पारस फार्मारॅकीट बँकिसर722 दशलक्ष डॉलर्स
2017युनिकॅम्स युनिट्सटॉरेंट557 दशलक्ष डॉलर्स
2006मायलन लॅब्स (उपकंपनी)मायलन495 दशलक्ष डॉलर्स

2022 मध्ये विकत घेण्यात आलेले ब्रँड्स…

विकलेला बँडअधिग्रहण करणारं आस्थापनमूल्य
पॅनसियामॅनकाईंड253 दशलक्ष डॉलर्स
क्युराशियो हेल्थटॉरेंट250 दशलक्ष डॉलर्स
सेंझायमीजेबी केमिकल्स85 दशलक्ष डॉलर्स
ओवाकनेटएरिस लाईफ83 दशलक्ष डॉलर्स
नोवार्तिसचा ब्रँडडॉ. रेड्डीस62 दशलक्ष डॉलर्स
अँग्लो प्रेंचल्युपिन44 दशलक्ष डॉलर्स
राझेल (ग्लेनमार्क)जेबी केमिकल्स39 दशलक्ष डॉलर्स
नोवार्तिसचा ब्रँडजेबी केमिकल्स33 दशलक्ष डॉलर्स
जेजे युनिट, तेलंगणहिटेरो16 दशलक्ष डॉलर्स

संकलन ः राजू प्रभू

Related Stories

पुणे : राम मंदिर भूमी पूजनानिमित्त महालक्ष्मी मंदिरात आनंदोत्सव

Tousif Mujawar

‘दगडूशेठ दत्तमंदिरा’ च्यावतीने ‘गुरुरुपी जीवरक्षकांना’ अभिवादन

Tousif Mujawar

श्रीलंका : प्रथमच जुळ्या हत्तींचा जन्म

datta jadhav

मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

Archana Banage

ऑनलाईन श्रीसुक्त पठणातून श्री महालक्ष्मी मातेला नमन

Tousif Mujawar

गुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

Tousif Mujawar