अन्नधान्य निर्यातीच्या दिशेने भारतासाठी मोठी उपलब्धी : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी यासंबंधीची घोषणा केली. त्यांनी ट्विट करत ‘इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. रशिया-युपेन युद्धामुळे अनेक गोष्टींचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. जग अन्न पुरवठय़ासाठी पर्यायी स्रोताच्या शोधात असताना मोदी सरकार पुढे आले आहे. आमच्या शेतकऱयांनी साठा केला आहे आणि आम्ही जगाची सेवा करण्यास तयार आहोत’ असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
इजिप्त या आफ्रिकन देशाने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. इजिप्त हा गव्हाचा मोठा आयातदार आहे, परंतु आतापर्यंत तो फक्त रशिया आणि युपेनकडूनच गहू खरेदी करत होता. आता त्याने भारतातून गहू घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नधान्याच्या निर्यातीच्या दिशेने भारतासाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. तसेच विशेषतः देशातील शेतकऱयांसाठी हा एक अतिशय फायदेशीर करार ठरणार आहे. यावषी इजिप्तला भारताकडून दहा लाख टन गहू खरेदी करायचा आहे. अलीकडेच देशात मोफत रेशन देणारा भारत जागतिक व्यापार संघटनेने परवानगी दिल्यास जगाला अन्नपुरवठा करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना सांगितले होते.
2020 मध्ये इजिप्तने रशियाकडून 180 दशलक्ष डॉलर्स आणि युपेनमधून 610.8 दशलक्ष डॉलर्स किमतीचा गहू आयात केला होता. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा गहू आयातक देश आहे. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत भारताने 170 दशलक्ष डॉलर्स किमतीचा गहू निर्यात केला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत केवळ 34.017 डॉलर्सची निर्यात झाली होती. आतापर्यंत, भारत आपल्या शेजारी देशांना जास्तीत जास्त गव्हाचा पुरवठा करत होता. या हिस्सेदारीत बांगलादेशचा 2020-21 मध्ये प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत सर्वाधिक 54 टक्क्मयांहून अधिक वाटा होता. बांगलादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया हे देश भारतातून होणाऱया गव्हाच्या पहिल्या 10 आयातदारांमध्ये आहे.