Tarun Bharat

भारत यू-17 फुटबॉल संघाचा ओमानवर विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या पुरुष यू-17 फुटबॉल संघाने मस्कतमध्ये झालेल्या मैत्रिपूर्ण सामन्यात ओमानवर 3-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला.

यजमान संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय यू-17 संघ मंगळवारी येथे दाखल झाला. एएफसी यू-17 आशियाई चषक पात्रता 2023 स्पर्धेच्या तयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आशियाई चषक पात्रता स्पर्धा सौदी अरेबियातील दम्माम येथे 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यात भारतातर्फे गंगते (10 वे मिनिट), थॉकचोम (18 वे मिनिट) यांनी पूर्वार्धात गोल नोंदवले. उत्तरार्धात 69 व्या मिनिटाला लालपेखलुआने भारताचा तिसरा गोल नोंदवला. ओमानचा एकमेव गोल अलहैथाम अलशुकैलीने सामना संपण्यास दोन मिनिटे असताना नोंदवला.

पूर्वार्धात भारताने आक्रमक धोरण अवलंबले आणि सातव्या मिनिटाला लालपेखलुआने मारलेला थू पास वाईड गेला. तीन मिनिटानंतर भारताला पेनल्टी मिळाली. त्यावर गंगतेने अचूक गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले. या गोलनंतर आत्मविश्वास बळावल्याने थॉकचोमने गाईटच्या पासवर 18 व्या मिनिटाला ही आघाडी 2-0 अशी केली.

Related Stories

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

Patil_p

अमित रोहिदासकडेच नेतृत्व, नीलमचे पुनरागमन

Patil_p

‘अश्विनास्त्रा’समोर कांगारुंची दाणादाण!

Patil_p

प्रॅपर्ट बनली चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पंचगिरी करणारी पहिली महिला

Patil_p

दुबई स्पर्धेत रशियाचा रूबलेव्ह अजिंक्य

Patil_p

फ्लोरेन्टिनाला नमवून युवेन्ट्स अंतिम फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!