Tarun Bharat

भारत-यूके व्यापार 2030 पर्यंत दुप्पट होईल

Advertisements

एका अहवालामधून माहिती सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुक्त व्यापार करार (एफटीए), तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि जागतिक पुरवठा साखळीतील वेगळेपण यासारख्या घटकांमुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत दुप्पट होणार आहे, असे एका अहवालातून सांगण्यात आले आहे. 

भारताचा ब्रिटनसोबतचा वस्तू आणि सेवांचा व्यापार 2022 मध्ये 31.34 अब्ज डॉलरवर जाईल, जो 2015 मध्ये 19.51 अब्ज डॉलरचा होता. ब्रिटन मीट्स इंडिया रिपोर्ट 2022 ची दुसरी आवृत्ती गुरुवारी ग्रँट थॉर्नटन इंडियाने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या भागीदारीत सुरू करण्यात आली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. सदरच्या अहवालानुसार भारतात 618 यूके कंपन्यांची ओळख पटली आहे, ज्या एकत्रितपणे अंदाजे 4.66 लाख लोकांना रोजगार देतात आणि त्यांची एकूण उलाढाल 3,634.9 अब्ज रुपयांची आहे. 

दोन्हीं देशांमधील एकत्रित गूंतवणूक

अहवालानुसार, 2000-2022 पर्यंत सुमारे 31.92 अब्ज डॉलर इतक्या एकत्रित गुंतवणुकीसोबत ब्रिटन भारतातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. हे भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) सुमारे 5.4 टक्के आहे.

Related Stories

कोळसा आयातीत 14 टक्क्यांची घसरण

Patil_p

अर्थव्यवस्थेत 9 टक्क्मयांच्या घसरणीचे संकेत

Patil_p

हुआईची क्लाउड कंटेंट नेटवर्क सेवा भारतात

Patil_p

टाटा हाऊसिंग मालदीवमध्ये करणार 270 कोटीची गुंतवणूक

Patil_p

सार्वजनिक क्षेत्रातील बँका डिसेंबरपर्यंत 300 शाखा उघडणार

Patil_p

बजाजचे सिंघल यांचा कालावधी वाढवला

Patil_p
error: Content is protected !!