ब्रिस्बेन :
भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचे गाबामध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे अपराजित होण्याचे रेकॉर्ड आजच्या सामन्यात भारतीय संघाने मोडले. तर भारताने गाबामध्ये पहिली कसोटी जिंकून इतिहास रचला आहे.
सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली.
पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं दमदार पुर्नगामन करत कसोटी मालिकेवर नाव कोरलं. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं आहे. अजिंक्य रहाणे २४ धावांवर बाद झाला. अजिंक्य राहणेनंतर पुजाराही ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतनं सामन्याची सर्व सुत्रं आपल्याकडे घेतली. पंतनं ८९ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.


previous post