Tarun Bharat

भारत होणार मोठी शक्ती ः व्हाइट हाउस

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावावरून अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत हा केवळ अमेरिकेचा सहकारी नसेल तर आणखी एक मोठी शक्ती होणार असल्याचे व्हाइट हाउसच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले आहे.

मागील 20 वर्षांमध्ये भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध अत्यंत वेगाने मजबूत आणि दृढ झाले आहेत, द्विपक्षीय संबंधांमधील अशाप्रकारची प्रगती यापूर्वी अन्य कुठल्याही देशाबाबतीत दिसून आली नव्हती असे अमेरिकेच्या अधिकाऱयाने नमूद केले आहे.

21 व्या शतकात अमेरिकेसाठी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार व्हाइट हाउसचे आशिया समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी ऐस्पन सिक्युरिटी फोरमच्या बैठकीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल काढले आहेत.

मागील 20 वर्षांमध्ये अमेरिका आणि भारताचे द्विपक्षीय संबंध अत्यंत वेगाने दृढ आणि मजबूत होत आहेत. तंत्रज्ञान आणि अन्य मुद्दय़ांवर एकत्र काम करताना अमेरिकेला स्वतःच्या क्षमतेहून अधिक गुंतवणूक करण्याची आणि लोकांमधील संबंध वाढविण्याची आवश्यकता आहे. भारताची एक अनोखी धोरणात्मक भूमिका आहे. भारत केवळ अमेरिकेचा सहकारी म्हणून राहू इच्छित नाही. एक स्वतंत्र, शक्तिशाली देश होण्याची क्षमता भारतात आहे. भारत निश्चितच महान शक्ती ठरणार असल्याचे कॅम्पबेल यांनी म्हटले आहे.

Related Stories

टोकियो शहरात संकट

Patil_p

महामार्गाच्या मधोमध कैद घर

Patil_p

13 वर्षीय मुलीकडून अद्भूत शोध

Patil_p

नेपाळची आणखी एक कुरापत

Patil_p

रशियन राजनयिकाचा मृत्यू, जर्मनीला संशय

Patil_p

15 कोटी रॅपिड टेस्ट करणार

Patil_p