Tarun Bharat

भारताने सामना जिंकला, झुलन गोस्वामीने मने!

Advertisements

तिसऱया व शेवटच्या सामन्यातही इंग्लिश संघाला धूळ चारली

लंडन / वृत्तसंस्था

क्रिकेटचा मक्का मानल्या जाणाऱया ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारताने इंग्लिश महिला संघाचा 16 धावांनी पराभव करत झुलन गोस्वामीच्या देदीप्यमान कारकिर्दीची विजयी सांगता केली. भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 45.4 षटकात सर्वबाद 169 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले होते. पण, प्रत्युत्तरात इंग्लिश संघाची त्याही पेक्षा दाणादाण उडाली आणि त्यांचा डाव 43.3 षटकात सर्वबाद 153 धावांवरच आटोपला. अर्थात, दीप्ती शर्माने इंग्लंडची शेवटची फलंदाज चार्लोट डीनला वादग्रस्त पद्धतीने धावबाद करणे वादाला निमंत्रण देणारे ठरले.

विजयासाठी 170 धावांचे आव्हान असताना डीनने 7 बाद 65 वरुन इंग्लंडला 8 बाद 103 धावांपर्यंत आणले व नंतरही तिचा धडाका कायम होता. पण, विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना नॉन स्ट्रायकर एण्डवरील डीनने गोलंदाजाकडून चेंडू रिलीज होण्याआधीच क्रीझ सोडले आणि याचा पुरेपूर लाभ घेत दीप्तीने बेल्स उडवत धावचीतचे अपील केले. तिसऱया पंचांनी डीन बाद असल्याचा निर्वाळा दिला आणि अशा रितीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेकीचा मान झुलन गोस्वामीला दिला, ते वैशिष्टय़पूर्ण ठरले.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ ः 45.4 षटकात सर्वबाद 169 (दीप्ती शर्मा 106 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 68, स्मृती मानधना 79 चेंडूत 5 चौकारांसह 50, पूजा वस्त्रकार 38 चेंडूत 4 चौकारांसह 22. अवांतर 20. केट क्रॉस 10 षटकात 4-26, प्रेया केम्प 2-24, सोफी इक्लेस्टोन 2-27, प्रेया डेव्हिस, चार्ली डीन प्रत्येकी 1 बळी).

इंग्लिश महिला संघ ः 43.3 षटकात सर्वबाद 153 (चार्ली डीन 80 चेंडूत 5 चौकारांसह 47, ऍमी जोन्स 50 चेंडूत 3 चौकारांसह 28, केट क्रॉस 15 चेंडूत 10, प्रेया डेव्हिस नाबाद 10. अवांतर 4. रेणुका सिंग ठाकुर 10 षटकात 4-29, झुलन गोस्वामी 10 षटकात 2-30, राजेश्वरी गायकवाड 10 षटकात 2-38, दीप्ती शर्मा 1-24).

दीप्तीला नियमाचा लाभ! काय सांगतो एमसीसी 41.16.1 चा नियम?

गोलंदाजाने सर्वसाधारणपणे चेंडू हातातून रिलिज करण्याची वेळ असते, त्यावेळी नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाजाने क्रीझ सोडून बाहेर गेले तर ते रास्त असते. पण, चेंडू हातातून रिलिज होण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर फलंदाज क्रीझ सोडत असेल तर गोलंदाज यष्टी उदध्वस्त करुन धावचीतचे अपील करु शकतो. दीप्तीने चेंडू रिलिज करण्याची जी वेळ होती, त्यापूर्वीच डीनने क्रीझ सोडले होते. त्यामुळे, दीप्तीने चेंडू रिलिज न करत डीनला धावचीत करण्याचा निर्णय घेतला आणि तिसऱया पंचांनी डीनला बाद दिल्याने दीप्तीने नियमाच्या चौकटीत राहून डीनला बाद केल्याचे सुस्पष्ट झाले!

Related Stories

केन विल्यम्सनच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम स्थितीत

Patil_p

बगान संचालकपदावरुन सौरभ गांगुली पायउतार

Amit Kulkarni

दियागो मारडोनाला रूग्णालयातून लवकरच डिस्चार्ज

Omkar B

कर्णधार स्टीव्ह स्मिथला दंड

Patil_p

भारतीय बुद्धिबळ संघाला संमिश्र दिवस

Patil_p

भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिकाविजय

Patil_p
error: Content is protected !!