Tarun Bharat

भारतीय सैन्याला मिळाली स्वदेशी शस्त्रास्त्र

Advertisements

आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत मंगळवारी सैन्याला स्वदेशनिर्मित अनेक शस्त्रास्त्रs सोपविली आहेत. यात अँटी-पर्सोनेल लँड माइन निपुण, पँगोंग सरोवरात संचालनासाठी लँडिंग क्राफ्ट अटॅक, इन्प्रंट्री कॉम्बॅट व्हेईकल आणि अनेक प्रणालींचा समावेश आहे. भारतीय सैन्याच्या ‘फ्यूचरिस्टिक इन्प्रंट्री सोल्जर इन ए सिस्टीमच्या नव्या शस्त्रप्रणाली तसेच एके-203 असॉल्ट रायफल आणि शस्त्रांची माहिती यावेळी संरक्षणमंत्र्यांना देण्यात आली.

सशस्त्र दलांसाठी शस्त्रप्रणालींच्या स्वदेशीकरणाला बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून मागील काही काळात विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या दिशेने आता पुढे जात सैन्यात अनेक नवी स्वदेशी उपकरणे सामील केले जात असून यात लँड माइन्स, पर्सनल वेपन्स आणि इन्प्रंट्री कॉम्बॅट व्हेईकल सामील असल्याचे सैन्याचे इंजिनियर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

भारतीय सैन्य कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. पश्चिमेकडील वाळवंट असो किंवा लडाखमधील अत्याधिक उंचीचा भाग कुठेही आव्हान उभे ठाकल्यास सामोरे जाण्याची तयारी असल्याचे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी सांगितले आहे. संरक्षण मंत्रालयाने जून महिन्यात 76,390 कोटी रुपयांच्या स्वदेशी सैन्य उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली होती.  या प्रस्तावांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून हिरवा कंदील दर्शविण्यात आला होता.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि सीमेवर पारंपरिक तसेच हायब्रिड युद्ध तसेच दहशतवादाशी लढा देण्याकरता सुमारे 4 लाख क्लोज क्वार्टर बॅटर कार्बाइनच्या खरेदीसाठी या परिषदेने मंजुरी दिली आहे. हा निर्णय भारतात छोटय़ा शस्त्रांच्या निर्मिती उद्योगाला विकसित करण्यासाठी मोठा पुढाकार आहे. किनारी क्षेत्रांमध्ये सुरक्षा वाढविण्यासाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेने तटरक्षक दलाकरता 14 वेगवान गस्त नौका खरेदी करण्यासही मंजुरी दिली आहे.

Related Stories

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.36 लाखांचा टप्पा

Rohan_P

यंत्रमानवाच्या साहाय्याने अग्निशमन

Patil_p

पोलीस दलाचे होणार आधुनिकीकरण

Patil_p

केयरटेकर करू शकत नाही मालमत्तेवर दावा

Patil_p

कोरोना : दिल्लीत दिवसभरात 8,798 नवे बाधित; 39 मृत्यू

Rohan_P

…अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत : चिराग पासवान

Rohan_P
error: Content is protected !!