2018 मध्ये हत्या करून भारतात फरार
सिडनी, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजविंदर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. 2018 मध्ये राजविंदरने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये एका महिलेची हत्या केली होती. त्यानंतर तो भारतात फरार परतला होता. राजविंदरने टोयाह कॉर्डिंग्ले नावाच्या महिलेची हत्या केली होती. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च 2021 मध्ये भारताला राजविंदर सिंगचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. ही विनंती यावषी नोव्हेंबरमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर हिंदी आणि पंजाबी दोन्ही बोलू शकणारे ऑस्ट्रेलिया पोलिसांचे अधिकारी गेल्या महिन्यात त्याला पकडण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटकेची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ऑक्टोबर 2018 मध्ये 24 वषीय टोयाह आपल्या कुत्र्यासोबत ऑस्ट्रेलियातील केर्न्सच्या उत्तरेला 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगेटी बीचवर फिरायला गेली असता तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दोन दिवसांनी राजविंदर ऑस्ट्रेलियातून भारतात आला होता. या घटनेचा तपास सुरू होता. मात्र, आरोपी राजविंदरचा शोध लागत नसल्याने क्वीन्सलँड पोलिसांनी गेल्या महिन्यात राजविंदरला पकडणाऱयासाठी 1 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. टोयाहच्या हत्येनंतर राजविंदर 22 ऑक्टोबर 2018 रोजी केर्न्समधून पळून गेला होता. 23 ऑक्टोबर रोजी तो सिडनीहून भारतात आल्याची नोंद सापडली होती.