एलॉन मस्कना अय्यादुराई म्हणाले,‘ या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मला सांगा’
नवी दिल्ली
‘इमेलचे शोधक’ आणि एमआयटी पीएचडीधारक डॉ.शिवा अय्यादुराई यांनी ट्विटरचे नवे सीईओ बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक शिवा अय्यादुराई यांनी ही ट्विटरवर माहिती दिली आहे.
शिवा अय्यादुराई यांनी एलॉन मस्क यांना टॅग केले आणि लिहिले आहे, की ट्विटरच्या सीईओ पदासाठी मला रस आहे. माझ्याकडे एमआयटीमधून घेतलेल्या चार डिग्री आहेत व मी आतापर्यंत 7 हायटेक सॉफ्टवेअर कंपन्या बनवल्या असल्याचेही अय्यादुराई यांनी सांगत कृपया मला या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सांगण्याची विनंती केली आहे.
शिवा अय्यादुराई यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन त्यांचे समर्थन केले आहे. काहींनी टेक इंडस्ट्रीतील त्यांच्या यशाची आणि अनुभवाची प्रशंसा केली आहे. तसेच काही लोकांनी ट्विटरचे सीईओ बनण्याच्या त्यांच्या संभाव्यतेबद्दल शंका व्यक्त केली आहे.
परंतु या सर्व घडामोडींमध्ये त्यांच्या या पोस्टवर एलॉन मस्क यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहे.
अन्य नोंदी …
मस्क यांनी 21 डिसेंबर रोजी सीईओपदाचा राजीनामा जाहीर केला
मस्कने युजर्सला ट्विटरचे सीईओ पद सोडायचे का, असे विचारले
1 कोटी 62 हजार ट्विटर युजर्स म्हणाले-मस्क यांनी राजीनामा द्यावा
यांनीही व्यक्त केली सीईओ होण्याची इच्छा
ट्विटरचे सीईओ म्हणून त्यांच्या जागी मस्क सक्रियपणे नवीन कार्यकारी शोधत आहेत. ज्यांना वेदना आवडतात तेच या पदावर काम करु शकतात, असा त्यांचा दावा आहे. एक लोकप्रिय युटय़ूबर मिस्टरबेस्ट यांनी देखील ट्विट केले, मी ट्विटरचा नवीन सीईओ बनू शकतो? या पोस्टमध्ये त्यांनी एलॉन मस्क यांनाही टॅग केले.