Tarun Bharat

अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

अमेरिकेत (America) अपहरण केलेल्या चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी आणि मुलीच्या काकाचा समावेश आहे. (four indians kidnapped in america found dead)

मिळालेल्या माहितीनुसार, जसदीप सिंग (वय ३६), त्यांची पत्नी जसलीन कौर (वय २७), त्यांची आठ महिन्यांची मुलगी आरुही आणि जसदीपचा भाऊ अमनदीप सिंग (वय ३९) यांचे अपहरण करण्यात आले होते. या चौघांची अपहरणानंतर अपहरणकर्त्याने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोघांच्या हत्येनंतर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता त्यांचे मृतदेह एका बागेत सापडले.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचींन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शेरिफ वार्न्के या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हाताला बांधलेल्या अवस्थेत ट्रकिंग कंपनीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच बाळासह जसलीन कौर इमारतीतून अपहरकर्त्यांसोबत बाहेर जाताना दिसत आहेत. या चौघांचे एका ट्रकमधून अपहरण करण्यात आले होते.

Related Stories

भारताने तालिबान विरोधकांना आश्रय देऊ नये

datta jadhav

‘टिकटॉक’चा ओरॅकलसोबतचा करार पूर्ण

datta jadhav

अयोध्येत महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, IPS अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

दिल्लीत दिवसभरात 1,139 नवे कोरोना रुग्ण; 32 मृत्यू

Tousif Mujawar

चिंता वाढली : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पार

Tousif Mujawar

लिबियात बोट उलटली; 74 जण बुडाले

datta jadhav
error: Content is protected !!