वृत्तसंस्था/ लिवरपूल (ब्रिटन)
येथे सुरू झालेल्या विश्व आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टचे आव्हान पात्र फेरीतच समाप्त झाले. या स्पर्धेमध्ये भारताची प्रणती नायक, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील माजी विजेती प्रोटिस्टा समंथा यांनी आपला सहभाग दर्शविला होता.
महिलांच्या वैयक्तिक व्हॉल्ट ऍपेरेटस या प्रकारातील पात्र फेरीमध्येच नायक आणि समंथा यांचे आव्हान संपुष्टात आले. 19 वषीय समंथाला पात्र फेरीमध्ये 25 व्या स्थानावर तर नायकला 26 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत पुरुष विभागात भारताचे जिम्नॅस्ट योगेश्वर सिंग आणि गौरवकुमार हे पुरुषांच्या ऑल राऊंड जिम्नॅस्ट प्रकारात पात्र फेरीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान योगेश्वर सिंगला 47 व्या तर गौरवकुमारला 62 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत ऑल राऊंड जिम्नॅस्ट प्रकारात पात्र फेरीतील आघाडीचे 24 जिम्नॅस्ट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. सदर स्पर्धेला 29 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ही स्पर्धा 6 नोव्हेंबरल संपणार आहे.