वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पॅनीश हॉकी फेडरेशनच्या शताब्दी महोत्सवानिमित्त स्पेनमधील टेरेसा येथे 25 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या चौरंगी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने शुक्रवारी 24 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.
या चौरंगी हॉकी स्पर्धेत यजमान स्पेन, भारत, इंग्लंड आणि नेदरलँड्स यांचा समावेश आहे. आगामी होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा राहिल. हरमनप्रित सिंगकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून हार्दिक सिंग उपकर्णधार राहिल.
भारतीय हॉकी संघ- गोलरक्षक- पी. श्रीजेस, कृष्णन बहाद्दूर पाठक, बचावफळी- जर्मनप्रित सिंग, निलम संजीब झेस, मनप्रित सिंग, अमित रोहीदास, हरमनप्रित सिंग (कर्णधार), वरुण कुमार, संजय, मध्यफळी- हार्दिक सिंग (उपकर्णधार), विवेक सागरप्रसाद, सुमित, निलकांत शर्मा, समशेर सिंग, राजकुमार पाल, आघाडीफळी- ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरुजंत सिंग, सुखजित सिंग, दिलप्रित सिंग, अभिषेक, पवन, सिमरनजित सिंग आणि कार्ति सेल्वम.