क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
ए. एस. गोजुरू कराटे असोसिएशन इंडिया यांच्यावतीने डी क्युब स्पोर्ट्स क्लब यलहंका बेंगळुरू येथे झालेल्या 2ऱ्या खुल्या निमंत्रीतांच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबने प्रथम सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
क्योशी एम. अल्ताफ पाशा यांच्या हस्ते चषक बहाल करण्यात आला. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 148 कराटेपटू सहभागी होऊन त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत अनेक राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे आयोजक क्योशी एम. अल्ताफ पाशा यांनी बेळगावच्या इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री गजेंद्र काकतीकर यांना शाल व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील सर्व विजेत्या कराटेपटूंना कराटे मास्टर श्री गजेंद्र काकतीकर, हेमलता ग काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, हरीष सोनार, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, परशुराम नेकनार, पूजा पाटील आणि ओमकार कावेथीया यांचे मार्गदर्शन लाभत आहे.