वृत्तसंस्था /काठमांडू
काठमांडूजवळील ललितपूर जिह्यातील औद्योगिक परिसरात ऑक्सिजन प्लांटमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. ब्रिजकुमार महतो असे मृत भारतीयाचे नाव आहे. जखमींमध्ये अन्य एक भारतीय आणि सहा नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी भारतीय नागरिकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पाटण औद्योगिक वसाहतीमधील सागरमाथा ऑक्सिजन प्लांटमध्ये गुरुवारी सकाळी कामगार सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला. स्फोटामुळे ऑक्सिजन प्लांटचे झिंक छप्परही उद्ध्वस्त झाले. तसेच शेजारील इमारतींच्या खिडक्मयांच्या काचा फुटल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना ललितपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.