Tarun Bharat

भारतीय पुरुष संघ खेळणार 141 आंतरराष्ट्रीय सामने

Advertisements

5 वर्षांचे फ्यूचर टूर्स प्रोग्रॅम जाहीर, पाकविरुद्ध मालिका नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय पुरुष संघ मे 2023 ते एप्रिल 2027 या कालावधीत 38 कसोटी, 42 वनडे व 61 टी-20 असे 141 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणार आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांवर भर असेल. वनडे लढतींचा समावेश असला तरी त्यांचे स्थान 3 सामन्यांच्या मालिकेपुरते मर्यादित आहे.

आयसीसीमधील 12 सदस्यीय संघ एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून यात 173 कसोटी, 281 वनडे व 323 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. पुढील हंगामात (जुलै-ऑगस्ट 2023) भारतीय संघ विंडीज दौऱयावर जाणार असून उभय संघात त्यात 2 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने होतील. इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका जानेवारी-मार्च 2024 मध्ये होणे अपेक्षित आहे. 5 वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे संघ अनुक्रमे 40 व 43 कसोटी सामने खेळणार आहेत.

Related Stories

पॅरा नेमबाज सिंघराजला सुवर्णपदक

Patil_p

सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम दुसरे मानांकन

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये भारताचे दीपक काब्रा पहिले जिम्नॅस्टिक पंच

Patil_p

श्रीलंका-बांगलादेश यांच्यात आज लढत

Patil_p

रवी शास्त्री म्हणतात, निवड समितीने रोहित शर्माला ‘या’ कारणासाठी वगळले!

Patil_p

Tokyo Olympics 2020 : बॉक्सर लवलीना सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!