Tarun Bharat

भारतीय पुरुष टेटे संघाचा फ्रान्सकडून पराभव

Advertisements

बाद फेरी गाठण्याच्या आशेला धक्का

वृत्तसंस्था/ चेंगडू, चीन

विश्व टेबल टेनिस सांघिक चॅम्पियनशिपमधील भारताच्या पुरुष संघाची साखळी फेरीतील विजयी घोडदौड फ्रान्सने रोखताना गट 2 मधील चौथ्या लढतीत भारतावर 3-0 अशी एकतर्फी मात केली. या पराभवामुळे भारताच्या शेवटच्या सोळामध्ये स्थान मिळविण्याच्या आशेला धक्का बसला आहे.

भारताला बाद फेरी गाठण्यासाठी आता इतर संघांच्या लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. या लढतीतील पहिल्या सामन्यात मानव ठक्करला लेब्रन ऍलेक्सिसने 11-6, 11-8, 11-8 असे सहज हरविले. दुसऱया सामन्यात भारताचा अव्वल खेळाडू जी. साथियनला लेब्रन फेलिक्सने 11-2, 11-4, 11-6 असे सहज नमवित फ्रान्सला 2-0 आघाडी मिळवून दिली. आव्हान राखण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणे आवश्यक होते. पण या महत्त्वाच्या सामन्यात हरमीत देसाईने शानदार सुरुवात करीत पहिला गेम जिंकला. रोलँड ज्युल्सने नंतरचा गेम जिंकल्यानंतर देसाईने पुढचा गेम जिंकून आघाडी घेतली. पण शेवटचे दोन गेम्स ज्युल्सने जिंकून देसाईचे आव्हान संपुष्टात आणले. ज्युल्सने हा सामना 11-13, 13-11, 7-11, 11-8, 11-7 असा जिंकत फ्रान्सचे बाद फेरीतील स्थान  निश्चित केले. भारताने आधीच्या तीन लढतीत उझ्बेकिस्तान, कझाकस्तान, जर्मनी यांच्यावर विजय मिळविले होते.

Related Stories

ओडिशाची मणिपूरवर एकमेव गोलने मात

Patil_p

नमन ओझा क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

पुढील बॅडमिंटन हंगामात नव्या गुणपद्धतीचा अवलंब

Patil_p

विंडीजविरुद्ध वनडे मालिकेसाठी धवनकडे नेतृत्व

Patil_p

प्रणव देसाईकडून भारताला पहिले सुवर्ण

Amit Kulkarni

युवेंटसच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल

Patil_p
error: Content is protected !!