मुलांच्या रडण्यासंबंधी नवे संशोधन : नवजात 6 आठवडे नव्हे, 6 महिन्यांपर्यंत अधिक रडतात
जर तुम्ही अलिकडेच पालक झाला असाल तर इंटरनेटवर अनेकदा लहान मूलाच्या रडण्यामागील कारणांचा शोध घेतला असाल. बहुतांश पालकांना आपले मूल अधिक का रडते, तो रडणे कधी थांबवणार असे प्रश्न पडत असतात. 1962 नंतर झालेल्या सर्व अध्ययनांमध्ये नवजात जन्मापासून 6 आठवडय़ांपर्यंत अधिक रडत असल्याचे म्हटले गेले. 12 व्या आठवडय़ानंतर रडण्याचे प्रमाण कमी होत जाते किंवा स्थिर होते.
परंतु डेन्मार्कच्या आरहूस विद्यापीठाच्या नव्या संशोधनात लहान मूल 12 आठवडेच नव्हे तर त्यानंतरही अधिक रडत असल्याचे दिसून आले आहे. नवजात एक दिवसात तीन तासांपेक्षा अधिक आणि आठवडय़ात कमीत कमी तीन दिवस रडत असल्यास त्याला अत्यंत अधिक रडणे मानले जावे. जन्मापासून 6 आठवडय़ांमध्ये 17-25 टक्के मुलं अशाचप्रकारे रडत असल्याचे उद्गार विद्यापीठाच्या कॉग्निटिव्ह सायन्सचे इन्स्ट्रक्टर अरनॉल्ट-क्वेंटिन यांनी काढले आहेत.
7,580 नवजातांवर संशोधन
विद्यापीठाच्या संशोधकाहंनी 17 देशांच्या 37 वेगवेगळय़ा संशोधन प्रकल्पांचे अध्ययन केले. यात 1 आठवडय़ापासून 52 आठवडे वय असलेल्या 7,580 नवजातांच्या रडण्याचा पॅटर्न पाहण्यात आला. अध्ययनात मुलांच्या रडण्याचा 12 महिन्याचा पॅटर्न पाहिला गेला. तर जुन्या अध्ययनांमध्ये 12 आठवडय़ांचाच पॅटर्न पाहण्यात आला होता. कुठल्याही मुलामध्ये 5 आठवडय़ांनी अधिक रडण्याचा ट्रेंड कमी होताना दिसला नसल्याचे संशोधकांना आढळून आले. मुलांचे अधिक रडणे आठवडे नव्हे तर 6 महिन्यापर्यंत सुरू राहू शकते. अध्ययनात सामील निम्मे नवजात हे मुलगे तर निम्म्या मुली होत्या. अधिक रडण्याचा पॅटर्न दोघांमध्ये समान दिसून आला.
भावनात्मक विकास
रडणे छोटय़ा मुलांच्या विकासासाठी एक आवश्यक हिस्सा असतो. मुले याचा वापर पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी करतात. पालक यावर कशाप्रकारे व्यक्त होतात, त्यावर मुलाचा भावनात्मक विकास ठरतो असे उद्याग न्यूरोसायंटिस्ट क्रिस्टिन पारसन यांनी काढले आहेत.
इटलीत रडण्याचे प्रमाण अधिक
नवजातांच्या रडण्याची सवय देशानुसार वेगवेगळी असल्याचे संशोधकांना आढळून आले. भारत, मेक्सिको आणि दक्षिण कोरियाचे नवजात हे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या नवजातांच्या तुलनेत कमी रडतात. भारतात 1-38 आठवडय़ांपर्यंतची मुले सरासरी 13-27 मिनिटे दररोज रडतात. तर इटलीत हे प्रमाण 148 मिनिटे आणि तुर्कस्तानात 190 मिनिटांपर्यंत असते. अमेरिकेत हे प्रमाण 89-113 आणि ब्रिटनमध्ये 50-121 मिनिटांपर्यंत आहे.