वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅरिसमध्ये खेळविल्या जाणाऱ्या 2024 च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय पथकाच्या प्रमुखपदी सत्य प्रकाश सांगवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्य प्रकाश सांगवान हे अखिल भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत.
देशातील पॅराऑलिम्पिक क्रीडा चळवळीमध्ये तब्बल 10 वर्षांचा सांगवान यांना अनुभव असून त्यांनी या क्षेत्राला वाहून घेतले आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 84 खेळाडूंचे पथक सहभागी होणार असून ते खेळाडू 12 विविध क्रीडा प्रकारात भाग घेतील. या स्पर्धेत भारतीय पथक अधिक पदके मिळविल, असा विश्वास पीसीआयचे अध्यक्ष देवेंद्र झाजेरिया यांनी व्यक्त केला.