Tarun Bharat

भारतीय औषध उद्योग घेणार मोठी झेप

आयसीआरए यांच्याकडून 6 ते 8 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आगामी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय फार्मा उद्योग (आयपीएम) सहा ते आठ टक्के दराने वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. रेटिंग एजन्सी आयसीआरए यांनी ही माहिती दिलेली आहे.

आयसीआरएचे सहाय्यक उपाध्यक्ष आणि क्षेत्र प्रमुख मैत्री माचेर्ला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, महसुलात 2022-23 मधील तीन ते चार टक्क्यांच्या तुलनेत 2023-24 मध्ये सहा ते आठ टक्के वाढ अपेक्षित धरली जात आहे. तसेच येणाऱ्या काळात औषधांची मागणी वाढीव राहणार आहे.

आर्थिक वर्ष 2011-12 आणि आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान आयपीएमने 10.9 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे.

माचेर्ला म्हणाले की, आर्थिक वर्ष 2017-18 पासून दरवर्षी आयपीएम वाढीला औषध किमतीत वाढीसह नवीन उत्पादनांच्या सादरीकरणाने हातभार लावला आहे. तथापि, या प्रत्येक आर्थिक वर्षांत खंडानुसार विक्री केवळ दोन ते तीन टक्क्यांनी वाढली आहे. याचीही नेंद यावेळी करण्यात आली आहे. 

Related Stories

मायकल क्लार्क झाले हिरोचे सीओओ

Patil_p

सप्ताहाच्या प्रारंभी बाजारात तेजीची उसळी

Patil_p

भारतात पेबल स्पार्क स्मार्टवॉच सादर

Patil_p

‘टीसीएस’चा निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वधारला

Patil_p

स्मार्टफोन शिपमेंटमध्ये घसरण

Amit Kulkarni

स्विगीची सेवा आता 125 शहरांमध्ये

Patil_p