Tarun Bharat

भारतीय चहा आयात केला जात नाही ?

निर्यातदारांची माहिती ः दोन्हींकडून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न

कोलकाता ः  भारतीय चहाचा प्रमुख खरेदीदार इराण चहा खरेदीसाठी अनिवार्य फॉर्म (प्रोफॉर्मा) भरत नाही आणि रुपयात पेमेंट करार अंतिम होण्याची वाट पहात असल्याची माहिती चहा निर्यातदारांनी नुकतीच दिली आहे.

 2021 मध्ये इराणने भारतामधून दोन कोटी 61.8 लाख किलोग्रॅम चहाची आयात केली, जी 2020 म्

ाध्ये पर्शियन आखाती देशाने केलेल्या तीन कोटी 37.5 लाख किलोग्रॅम चहाच्या आयातीपेक्षा खुपच कमी राहिली असल्याचे सांगितले.

 यावेळी इंडियन टी असोसिएशनचे (आयटीए)सरचिटणीस अरिजित राहा म्हणाले, इराणने भारतामधून चहाची आयात बंद केल्याचे वृत्त आम्ही पहात आहोत. आम्ही चहा बोर्डाला कळवले आहे, जे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चलन ऑर्डरच्या नोंदणीशी संबंधीत काही समस्या आहेत ज्यांची इराणी आयातदारांकडून दखल घेतली जात नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

  यावर इंडियन टी एक्सपोर्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष अंशुमन कनोरिया म्हणाले, की संघटना या संदर्भात टी बोर्डाच्या स्पष्टीकरणाची वाट पहात आहे.

खरेदीला उशिर करत आहेत

 त्यांच्या इराणी संपर्कातील सदस्यांनी सांगितले, की ते खरेदी करण्यासाठी उशिर करत आहेत. तसेच त्यांना सांगण्यात आले, की रुपयात पैसे देण्याबाबत तोडगा काढला जात आहे, ज्यामुळे तिसऱया देशांद्वारे व्यापार करण्याची गरज नाहीशी होणार असल्याचेही स्पष्टीकरण निर्यात विपणन सल्लागार संजय मुखर्जी यांनी दिले आहे.

चर्चा सुरु

 इराणवरील निर्बंधांमुळे भारतीय रुपयात व्यापार नियमित करण्यासाठी दोन्ही सरकारांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

Related Stories

शिपिंग कॉर्पोरेशनचा हिस्सा विकणार

Patil_p

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विश्वनाथन यांचा राजीनामा

tarunbharat

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Patil_p

डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ

datta jadhav

मार्चमध्ये देशातील खाद्य तेलाची आयात घटली

Patil_p

विज्ञानाची आवड

Patil_p