वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात मार्क्वी येथे होणाऱया विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी चार सदस्यांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला. मात्र दुखापतीमुळे भारताच्या जेरेमी लालरिनुंगाला ही स्पर्धा हुकणार आहे.
गेल्या जुलैमध्ये झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमीने सुवर्णपदक पटकाविले होते. मिझोरामच्या 20 वर्षीय जेरेमीला यापुर्वी स्नायू दुखापतीचा तसेच मांडीला झालेल्या जखमेचा त्रास सहन करावा लागला. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नसल्याने तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही असे भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिले.
आगामी विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी चार सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती महिला वेटलिफ्टर मिराबाई चानू भारताचे प्रतिनिधीत्व करेल. सदर विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धा कोलंबियातील बेगोटा येथे 5 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत चानूने सुवर्णपदक पटकाविले होते. मिराबाई चानू 49 किलो गटात, बिंदिया राणीदेवी 59 किलो गटात, अचिंता शेउली 73 किलो गटात आणि गुरुदीप सिंग 109 किलोवरील वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.