गरोदर महिलेला मिळाली नाही रुग्णालयात जागा ः आरोग्यमंत्र्याला सोडावे लागले पद
वृत्तसंस्था / लिस्बन
पोर्तुगालमध्ये प्रसूती कक्षात जागा नसल्याने एका गरोदर महिला पर्यटकाला भरती करण्यात आले नव्हते आणि याचमुळे तिचा मृत्यू ओढवला होता. भरती होण्याकरता राजधानी लिस्बन येथील रुग्णालयांच्या फेऱया मारत असतानाच 34 वर्षीय भारतीय महिलेला कथितपणे हृदयविकाराचा धक्का बसला होता. या घटनेनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्था टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. पोर्तुगालच्या रुग्णालयांमधील मॅटर्निटी वॉर्डमध्ये कर्मचाऱयांची मोठय़ा प्रमाणात कमतरता असल्याचे मानले जातेय.
टेमिडो या 2018 पासून पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. कोरोना महामारीतून देशाला यशस्वीपणे बाहेर काढण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. परंतु भारतीय महिला पर्यटकाच्या मृत्यूमुळे डॉ. टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागल्याचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी सांगितले आहे.
भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगाल सरकारवर टीकेची झोड उठली आहे. पोर्तुगालमधील सर्वात मोठे रुग्णालय सांता मारिया हे राजधानी लिस्बनमध्ये आहे. या रुग्णालयाच्या नियोनेटोलॉजी युनिटमध्ये जागा नसल्याने गरोदर महिला पर्यटकाला भरती करण्यात आले नव्हते. परंतु दुसऱया रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वी या महिलेचा मृत्यू झाला होता.
बाळ बचावले
एका इमर्जन्सी सिझेरियन सेक्शननंतर या महिलेच्या बाळाला वाचविण्यात आले आहे. तर महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोर्तुगालमध्ये मागील काही काळात दोन नवजातांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गरोदर महिलांना एका रुग्णालयातून दुसऱया रुग्णालयात हलविण्यात येत असल्याने प्रसूतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचाऱयांची मोठी कमतरता आहे. विशेष करून स्त्राrरोग अन् प्रसूती तज्ञांची कमतरता आहे. याचमुळे पोर्तुगाल सरकारला विदेशातून आरोग्य कर्मचारी मागवावे लागत आहेत.
पोर्तुगालमध्ये मोठे संकट
काही प्रसूती कक्ष बंद झाल्याने कार्यरत प्रसूती कक्षांमध्ये गर्दी होत आहे. या प्रकाराला आरोग्यमंत्री जबाबदार असल्याची टीका विरोधी पक्ष तसेच डॉक्टर अन् नर्स करत आहेत. मार्था टेमिडो यांच्याकडे या संकटाचे निवारण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तोडगा नव्हता, असे उद्गार पोर्तुगालच्या डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिगुएल गुइमारेस यांनी काढले आहेत.