10 वर्षांपूर्वी पुरुषांइतका यायचा संताप, आता 12 टक्के अधिक प्रमाण
अमेरिकेपासून आफ्रिका आणि आशियापासून युरोपपर्यंत मागील 10 वर्षांमध्ये जग वेगाने बदलले आहे. लोकांमध्ये तणाव, संताप आणि चिंतेची पातळी वाढली आहे. लोक आता पूर्वीपेक्षा अधिक उदास आणि दुःखी आहेत. महिलांमध्ये याचे प्रमाण तर अधिकच आहे. मागील एक दशकता लोकांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी गॅलप वर्ल्ड पोलने 2012-21 पर्यंत 150 देशांच्या 12 लाख लोकांवर सर्वेक्षण पेले आहे. 10 वर्षांपूर्वी महिला-पुरुषांमध्ये संताप आणि तणावाची पातळी समान होती, परंतु 10 वर्षांमध्ये महिलांमधील तणाव अधिक वाढला आहे. महिला आता अधिक क्रोधित होऊ लागल्याचे गॅलप वर्ल्ड पोलने म्हटले आहे.


जगभरातील महिलांमध्ये आक्रोशाची पातळी पुरुषांपेक्षा 6 टक्क्यांनी अधिक आहे. भारत आणि पाकिस्तानच्या महिलांमध्ये तणाव आणि संतापाची पातळी जागतिक स्तरापेक्षा दुप्पट म्हणजेच 12 टक्के आहे. भारतात पुरुषांमध्ये संतापाची पातळी 27.8 टक्के आहे. तर महिलांमध्ये हे प्रमाण 40.6 टक्के आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांमध्ये ही पातळी अधिकच वाढली आहे.
जगभरातील महिलांमधील वाढता तणाव आणि संतापाचे कारण मनोवैज्ञानिक डॉ. लक्ष्मी विजय कुमार यांनी सांगितले आहे. सर्वच देशांमध्ये महिला पूर्वीपेक्षा अधिक साक्षर झाल्या असून नोकरी करत आहेत. यामुळे त्यांच्यात आत्मनिर्भरतेवरून आत्मविश्वास निर्माण झाला आहे, परंतु घरांमध्ये पितृसत्तात्मक व्यवस्था अद्याप रुढ आहे, तर घराबाहेर समानतेबद्दल बोलले जात असल्याचे त्यांचे सांगणे आहे.


या असंतुलनादरम्यान कोंडी झालेल्या महिला आता आवाज उठवू लागल्या आहेत. स्वतःचा संताप व्यक्त करू लागल्या आहेत. पूर्वी महिलांनी संतप्त होणे वाईट मानले जात होते. परंतु समाजाची मानसिकता आता बदलली आहे. आता हा नैतिक दबाव कमी झाला आहे. महिला स्वतःच्या भावना व्यक्त करू लागल्या आहेत.
कमी वेतन, अधिक अपेक्षा
महिलांच्या संतापावरील पुस्तक ‘रेज बिकम्स हर’च्या अमेरिकन लेखिका सोराया शेमली यांनी आरोग्यासारख्या सेवांमध्ये महिलांची भागीदारी असली तरीही कामाच्या तुलनेत वेतन कमी मिळत असल्याचे म्हटले आहे. महिलांकडून अपेक्षा अधिक असतात. याच अपेक्षा महिलांकडून घरात देखील असता. याचमुळे त्यांच्या संताप वाढत असल्याचा दावा शेमली यांनी केला आहे.