Tarun Bharat

भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल

Advertisements

वृत्तसंस्था /बर्मिंगहम

रेणुकासिंग ठाकुर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टी-20 या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली. बुधवारी रात्री एजबॅस्टन मैदानावर झालेल्या अ गटातील सामन्यात भारताने बार्बाडोसचा 100 धावांनी दणदणीत पराभव केला.

या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बुधवारच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजयाची आवश्यकता होती. टी-20 क्रीडा प्रकारातील भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा दुसऱया क्रमांकाचा मोठा विजय आहे. गुरुवारी यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ब गटातील सामना होणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीतील सामना शनिवारी होईल.

अ गटातून ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. बुधवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर बार्बाडोसने 20 षटकात 8 बाद 62 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना मोठय़ा फरकाने गमवावा लागला.

भारताच्या डावामध्ये जेमिमा रॉड्रिग्जने 46 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 56, शफाली वर्माने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43, स्मृती मानधनाने 1 चौकारासह 5, तानिया भाटियाने 6, दीप्ती शर्माने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. कर्णधार हरमनप्रित कौरला खाते उघडता आले नाही. रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा यांनी दुसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. तसेच रॉड्रिग्जने दीप्ती शर्मासमवेत पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 70 धावांची भागीदारी केली. भारताच्या डावामध्ये 3 षटकार आणि 17 चौकार नेंदविले गेले. बार्बाडोसतर्फे ब्रुस, मॅथ्यूज आणि सेलमन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बार्बाडोसच्या डावामध्ये नाईट आणि सेलमन या दोन खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली. नाईटने 20 चेंडूत 1 चौकारासह 16 तर सेलमनने 16 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. बार्बाडोसच्या डावात 6 चौकार नोंदविले गेले. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज रेणुकासिंग ठाकुरने आपल्या 4 षटकात 10 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. मेघना सिंग, स्नेह राणा, राधा यादव आणि हरमनप्रित कौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकात 4 बाद 162 (रॉड्रिग्युज नाबाद 56, शेफाली वर्मा 43, स्मृती मंदाना 5, तानिया भाटिया 6, दीप्ती शर्मा नाबाद 34, ब्रुस, मॅथ्यूज आणि सेलमन प्रत्येकी 1 बळी), बार्बाडोस 20 षटकात 8 बाद 62 (नाईट 16, सेलमन नाबाद 12, रेणुकासिंग ठाकुर 4-10, मेघना सिंग, स्नेह राणा, हरमनप्रित कौर आणि राधा यादव प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

शेली प्रेजरची जलद वेळ

Patil_p

सिंधूच्या विनंतीला साईची मान्यता

Patil_p

उत्तुंग विजय प्राप्त केला तरच केकेआरला संधी

Patil_p

पाकची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

माजी हॉकी प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे निधन

Patil_p

जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!