नवी दिल्ली : चालू महिन्याच्या अखेरीस जॉर्डन आणि उझ्बेकिस्तान यांच्याविरुद्ध होणाऱया आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या महिलांच्या फुटबॉल सामन्यांसाठी गुरुवारी 23 फुटबॉलपटूंचा भारतीय महिला संघ जाहीर करण्यात आला. या संघाला थॉमस डिनेरबाय यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भारतीय वरि÷ महिला फुटबॉल संघ 17 ते 22 मार्च दरम्यान जॉर्डनच्या दौऱयावर हे मित्रत्वाचे सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय महिला फुटबॉल संघ उझ्बेक महिला संघाबरोबर 23 आणि 29 मार्चला दोन सामने खेळणार आहे. आगामी एएफसी महिलांच्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघ पहिल्या फेरीत यापूर्वीच दाखल झाला आहे. या पात्रतेच्या स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाला सराव मिळावा यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने हा आगामी दौरा उपलब्ध करून दिला आहे. पात्रफेरीच्या स्पर्धेत भारत क गटात आहे. या गटामध्ये यजमान किर्गिस्तान, तुर्केमेनिस्तान यांचा समावेश आहे. ही पात्र फेरीची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने 4 ते 10 एप्रिल दरम्यान खेळविली जाणार आहे.
भारतीय महिला फुटबॉल संघ
- गोलरक्षक- सौम्या नारायणस्वामी, श्रेया हुडा, इ. चानू,
- बचावफळी- एल. आशालता देवी, स्विटी देवी एन., रितू राणी, रंजना चानू, मिचेल कॅस्टेना, डालिमा छिबर, मनीषा पन्ना, ज्युली किशन,
- मध्यफळी- शिलकीदेवी हेमाम, अंजू तमांग, के. इंदुमती, बी. संगीता, रोजादेवी असेम, ए. कार्तिका, कश्मीना,
- आघाडीफळी- ग्रेस डांगमेई, रेणु, करिश्मा शिरवईकर, संध्या रंगनाथन आणि अपूर्णा नागझरी.