Tarun Bharat

भारतीय महिला फुटबॉल संघ स्पेनला रवाना

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

17 वर्षाखालील भारतीय महिला फुटबॉल संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने त्यांना स्पेनचा दौरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. दरम्यान भारतीय महिला फुटबॉल संघ स्पेनच्या दौऱयावर रवाना झाला. या दौऱयामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघासाठी काही मित्रत्वाचे फुटबॉल सामने आयोजित केले आहेत.

आगामी होणाऱया फिफाच्या 17 वर्षाखालील महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सराव होण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा राहिल. स्पेनच्या दौऱयातील काही आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे सामने पुढील आठवडय़ात होणार आहेत. फिफाची 17 वर्षाखालील महिला विश्व करंडक स्पर्धा 11 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे.  भारतीय फुटबॉल क्षेत्राला अधिक चालना मिळावी तसेच महिला फुटबॉलचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय फुटबॉल फेडरेशनचे प्रयत्न चालू आहेत. 23 सदस्यांचा भारतीय महिला फुटबॉल संघ प्रशिक्षक वर्गासमवेत भुवनेश्वर येथून स्पेनला शुक्रवारी रात्री रवाना झाला.या संघामध्ये मेलोडी छानू केशाम, मोनालिसा देवी, अंजली मुंडा, ए. ओरॉन, ग्लेडीस झोनुनसांगी, काजल, नकिता, पुर्णिमाकुमारी, वर्षिका, शिल्कीदेवी हेमाम, निकिता जुदे, बबिना देवी, नितू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग, एल. अनिता, काजोल डिसोजा, लावण्या उपाध्ये, सुधा अंकिता तिर्की.

Related Stories

10 हजार मीटर्समध्ये इथिओपियाचा बरेगा अजिंक्य

Patil_p

जेव्हा यजुवेंद चहल क्रिकेटकडून पुन्हा बुद्धिबळाकडे वळतो!

Patil_p

भारताची कांगारुंना सणसणीत चपराक!

Patil_p

हार्दिक पंडय़ाचे षटकारांचे जलद ‘शतक’

Patil_p

तंत्रशुद्धतेत राहुल द्रविड सर्वोत्तम भारतीय फलंदाज

Patil_p

पाकची द.आफ्रिकेवर 33 धावांनी मात

Amit Kulkarni
error: Content is protected !!