Tarun Bharat

भारतीय महिलांचा अमेरिकेवर विजय

वृत्तसंस्था/ रॉटरडॅम

एफआयएच महिला प्रो लीग हॉकी स्पर्धेतील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. याच संघात दुसरी लढत होणार आहे.

Advertisements

डॅनियली ग्रेगाने 28 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत अमेरिकेला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने आक्रमण तेज करीत 31, 32 व 40 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवत 3-1 अशी आघाडी मिळविली. दीप ग्रेस एक्का, नवनीत कौर, सोनिका यांनी हे गोल नोंदवले. अमेरिकन महिलांनी भारताची ही आघाडी कमी करताना 45 व्या मिनिटाला गोल नोंदवला. नताली कोनेर्थने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. 50 व्या मिनिटाला मैदानी गोल करीत वंदना कटारियाने भारताला दोन गोलांची आघाडी पुन्हा मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. पण अखेरपर्यंत त्यांना यश आले नाही.

Related Stories

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे पुनरागमन

Patil_p

विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

सराव सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

Patil_p

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Abhijeet Shinde

व्हेटोरींची बीसीबीच्या कर्मचाऱयांना मदत

Patil_p

विश्वचषकातील ‘तो’ पराभव आजही सल देणारा

Patil_p
error: Content is protected !!