Tarun Bharat

भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर लँकेशायरशी करारबद्ध

Advertisements

लंडन / वृत्तसंस्था

लँकेशायर क्रिकेटने भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध केले. युके व्हिसाची पूर्तता केल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर जुलैमध्ये ओल्ड ट्रफोर्डवर दाखल होणे अपेक्षित आहे. उपलब्धतेनुसार, वॉशिंग्टन सुंदरला रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, तो काही कौंटी चॅम्पियनशिप गेम्समध्येही खेळू शकतो.

22 वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन ऑफस्पिन गोलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून आयपीएलमध्ये 50 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.

‘इंग्लिश वातावरणात खेळण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल आणि या संधीची मी प्राधान्याने प्रतीक्षा करत आहे. ही संधी प्राप्त करुन देण्यात मोलाचे सहकार्य लाभलेल्या लँकेशायर क्लब व बीसीसीआय व्यवस्थापनाचा मी विशेष आभारी आहे’, असे त्याने पत्रकातून नमूद केले.

यापूर्वी 2017 मध्ये 18 वर्षे 80 दिवस वय असताना वॉशिंग्टन सुंदर भारतातर्फे टी-20 पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्यानंतर त्याने या क्रिकेट प्रकारात 31 सामने खेळत 25 बळी घेतले. वॉशिंग्टनने याशिवाय 4 वनडे व 4 कसोटी सामन्यातही भारताचे प्रतिनिधीत्व केले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करणाऱया स्पिनरची तुलना अव्वल अष्टपैलू रविचंद्रन अश्विनशी केली जाते.

2016 यू-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघातर्फे खेळल्यानंतर वॉशिंग्टनने 2017 मध्ये आयपीएल प्रँचायझी रायजिंग पुणे सुपरजायंट संघात अश्विनची जागा घेतली होती. त्या स्पर्धेत त्याने लक्षवेधी मारा केला आणि त्याचा संघ अंतिम सामन्यातही पोहोचला होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरने 17 सामन्यात 36 बळी घेतले असून लिस्ट ए क्रिकेटमध्ये 44 बळी नोंदवले आहेत. लँकेशायर क्लबने यापूर्वी 2021 मध्ये श्रेयस अय्यरला करारबद्ध केले. पण, अय्यर त्यावेळी दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेचे सर्व क्रिकेटपटू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p

ओडिशा महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

स्पेन फुटबॉलपटूंचा बंदिस्त प्रशिक्षण शिबिरास विरोध

Patil_p

एफ-वन चालक गॅस्ली कोरोनाबाधित

Patil_p

सेबॅस्टियन कोर्डा विजेता

Patil_p

राष्ट्रीय युवा ऍथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!