Tarun Bharat

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च

Advertisements

टाटाच्या टियागो ईव्ही कार बाजारात ः किंमत 8.49 लाख रुपये ः 10 ऑक्टोबरपासून बुकिंगला प्रारंभ

मुंबई

 टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो ईव्ही गाडी सादर केली आहे. गाडीची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. एका चार्जमध्ये 315 किलोमीटर इतके उत्तम असे गाडी मायलेज देणार आहे. सदरची गाडी 10 ऑक्टोबर 2022 पासून संभाव्य ग्राहकांना बुक करता येण्याची संधी असणार आहे आणि जानेवारी 2023 पासून तिचे वितरण होणार असल्याची माहिती आहे. 

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टाटा टिगोर ईव्ही सारख्या मॉडेलसह देशातील ईव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. टाटा टियागो ही ईव्ही सेगमेंटमधील भारताची पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. डिसीफास्ट चार्जरने टियागोची बॅटरी 80 टक्के पर्यंत चार्ज होण्यासाठी केवळ 57 मिनिटे लागणार असल्याचा दावाही कंपनीने यावेळी केला आहे.

 टियागो 8 स्पीकर सिस्टीम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि इतर अनेक वैशिष्टय़ांसह येते. टियागो ईव्ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  टाटा टियागोला दोन ड्रायव्हिंग मोड मिळतील. ही ईव्ही 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग घेईल. टियागो ईव्हीच्या पहिल्या 10,000 बुकिंगपैकी 2000 युनिट्स टाटा ईव्हीच्या विद्यमान वापरकर्त्यांसाठी राखीव असतील. 

4 वर्षात 10 ईव्ही आणण्याची योजना

पुढील 4 वर्षांत 10 बॅटरी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची टाटाची योजना आहे. 76 व्या वार्षिक अहवालाप्रसंगी संबोधित करताना, अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, की भारतात आमच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) समावेश आता या वर्षी दुप्पट होऊन 2 टक्के झाला आहे.

Related Stories

‘टेस्ला’ वर्षअखेरीस 7 इलेक्ट्रीक कार्स भारतात आणणार

Patil_p

वाहन विक्री वाढीने उत्साहाचे वातावरण

Amit Kulkarni

भारताची इलेक्ट्रीक मोटरसायकल ऑक्टोबरमध्ये बाजारात

Patil_p

हिरो इलेक्ट्रिकचा रेव्हफिनसोबत करार

Patil_p

मारुतीची बंदच्या काळात 5 हजार कार्सची विक्री

Patil_p

मारूती एस-क्रॉस 5 ऑगस्टला बाजारात

Patil_p
error: Content is protected !!