केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 2024-25 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) गाठण्याच्या मार्गावर आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते शुक्रवारी उद्योग संस्था एफआयसीसीआय तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र सरकार विकास आणि रोजगार वाढवण्यावर भर देत आहे. गडकरी म्हणाले की, 2030 पर्यंत जागतिक हे उद्दिष्टे साध्य करण्यास भारत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
स्वच्छ व हरित इंधनावर भर
‘आम्ही बायो-इथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी, स्वच्छ आणि हरित इंधनांच्या विकासावर काम करत आहोत. तसेच सध्या देशातील वाहन उद्योग 7.5 लाख कोटी रुपयांचा आहे. तो 15 लाख कोटी रुपयांवर नेणार असून यामुळे मोठय़ा प्रमाणात नवीन रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा मंत्री गडकरी यांनी कार्यक्रमात केला आहे.’