Tarun Bharat

भारताच्या ऊर्जा वापरात जूनमध्ये 17 टक्क्यांनी वाढ

वाढीसोबत 134.13 अब्ज युनिटवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

 उष्णतेने हैराण व आर्थिक सुधारणेच्या दरम्यान देशातील ऊर्जेचा वापर हा जून 2022 मध्ये वर्षाच्या आधारे जवळपास 17.2 टक्क्यांनी वधारुन 134.13 अब्ज युनिट (बीयू) झाला आहे, अशी माहिती विद्युत मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीमधून देण्यात आली आहे.

हाच आकडा जून 2021 मध्ये ऊर्जा विक्री ही 114.48 बीयू वर राहिली होती जी जून 2020 च्या दरम्यान 105.08 बीयू होती. चालू वर्षातील जून महिन्यात 8 तारखेला वीज विक्री ही 209.80 गीगावॅट इतकी सर्वोच्च टप्पा प्राप्त करु शकली आहे. एक दिवसातील सर्वात जास्त विक्री असल्याची माहिती आहे.

कोरोना महामारीचा वेगाने होणार प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जून 2020 मध्ये विजेची मागणी प्रभावीत झाली होती. अभ्यासकांच्या माहितीनुसार ऊर्जा विक्री व मागणीमध्ये वाढ होण्याचे कारण हे अधिकची गरमी व आर्थिक अडचणीची समस्या होते. मात्र देशातील विजेची मागणी मुख्यतः वाणिज्य व औद्योगिक क्षेत्राने अधिक नोंदवली असल्याची बाबही समोर आली आहे.

Related Stories

अध्यक्षपदाचे ‘गूढ’

Patil_p

दासबोधः व्यवस्थापनक्षेत्राचा आत्मा नसून पाया

Patil_p

महिला शिक्षणाचा सन्मान

Patil_p

नजर फैसला आणि विस्ताराकडे

Patil_p

बैठकीचे फलित काय?

Amit Kulkarni

जपानमधील वर्ण व वंशवाद

Patil_p