Tarun Bharat

2021-22 मध्ये भारताची निर्यात 44 टक्क्यांनी वधारली

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) च्या सहा देशांमध्ये भारताची निर्यात 2021-22 मध्ये वार्षिक 44 टक्क्यांनी वाढून सुमारे 43.9 अब्ज डॉलर्सची  झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात हा आकडा 27.8 अब्ज डॉलरचा होता.

फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (फियो) या निर्यातदारांची सर्वोच्च संस्था यांनी ही माहिती दिली असून, निर्यातीत 68 टक्के वाढीसह आखाती देशांमध्ये अव्वल स्थानावर असल्याची माहिती आहे.

भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि सर्वात मोठा निर्यात भागीदार यूएइमध्ये निर्यात गेल्या आर्थिक वर्षात 28 अब्ज डॉलर्सची झाली आहे. 2020-21 आर्थिक वर्षात हा आकडा 16.7 अब्ज डॉलरचा होता.

जीसीसीची स्थापना मे 1981 मध्ये झाली. सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, ओमान, कतार आणि यूएई हे त्याचे सदस्य आहेत.

फियोचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय सहाय, म्हणाले, ‘आमची जीसीसीची 2021-22 आर्थिक वर्षात निर्यातीची कामगिरी खूप चांगली आहे.

Related Stories

पुलवामात चकमक, 1 दहशतवादी ठार

Amit Kulkarni

देहरादूनमध्ये कोरोना बाधितांची संख्या 550 वर

Tousif Mujawar

निष्पापाला पाहून मारेकऱयाचे मन बदलले

Patil_p

‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Patil_p

ख्राइस्टचर्च हल्ला : गुन्हेगाराला जन्मठेप

Patil_p

1 जूनपासून नॉन एसी रेल्वे धावणार

Patil_p
error: Content is protected !!