गांधीनगर
गुजरातमधील गांधीनगर येथे भारतातील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. गिफ्ट सिटी येथे हा कार्यक्रम पार पडला आहे. भारत आता या योगे सिंगापूर, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांच्या पंक्तीत सामावला गेला असल्याचे बोलताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितले. जागतिक स्तरावर भारत हा गुंतवणूकीसाठी मोठा देश ठरतो आहे. बुलियन एक्स्चेंजवर व्यवहार पारदर्शकता राहणार आहे. देशभरातील सोन्याचा दर हा एकसमान राहण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. छोटे व्यापारी, छोटे सराफ यांनाही या एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या व्यवहारात सहभागी होता येणार आहे. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजच्या माध्यमातून सोन्याची देवाण घेवाण करणेही शक्य होणार आहे. यायोगे सोने-चांदीची आयातही करता येणार असल्याचे सांगितले जात आहे.