Tarun Bharat

भारताचा जीडीपी अंदाज वर्ल्ड बँकेने वाढविला

नवी दिल्ली

  भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात (2022-2023 मध्ये)6.9 टक्क्यांच्या दराने वधारणार असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने मंगळवारी व्यक्त केला आहे. या अगोदर ऑक्टोबरमध्ये बँकेने जीडीपी अंदाज हा 7.5 टक्क्यांनी कमी होत तो 6.5 टक्क्यांवर राहणार असल्याचे भाकीत केले होते.

वर्ल्ड बँकेने म्हटले आहे,  की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवरील विविध प्रकारच्या आर्थिक संकटांमध्येही सकारात्मक पातळीवर आपला प्रवास करत आहे. यासोबतच चालू वर्षात सरासरी किरकोळ महागाई दर 7.1 टक्के राहणार असल्याचे संकेतही व्यक्त केले आहेत.

आरबीआयचा अंदाज

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या पतधोरण संदर्भातील बैठकीत आर्थिक वर्ष 2023 साठी रियल जीडीपी वाढीचा अंदाज हा 7 टक्के केला आहे. तसेच येत्या दोन तिमाहीत आरबीआयने जीडीपी अंदाज 4.6 टक्के केला आहे.

Related Stories

कोरोनामुळे 70 टक्के स्टार्टअप प्रभावित

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला

Patil_p

2032 पर्यंत भारत जगातील सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ असेल

Patil_p

नोव्हेंबरमध्येही देशातील विदेशी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Omkar B

स्टार्टअप निधीत 24 अब्ज डॉलर्सची भर

Patil_p

रेल्वेची विशेष फे-यांमधून 20 कोटीची कमाई

Patil_p