Tarun Bharat

भारताची श्रीलंकेला मानवता तत्वावर मदत

वृत्तसंस्था/ कोलंबो

अन्नधान्यांच्या अभूतपूर्व टंचाईमुळे ग्रासलेल्या श्रीलंकेला भारताने पाठविलेले मानवता साहाय्य त्या देशात पोहोचले असल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले भारतीय जहाज कोलंबो बंदरात पोहोचले आहे. या जहाजात तांदूळ, औषधे आणि दुधाची भुकटी अशा वस्तूंचा समावेश आहे.

Advertisements

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या जहाजाला हिरवा झेंडा दाखविला होता. चेन्नई बंदरातून बुधवारी ते रवाना झाले. मानवता तत्वावर केलेल्या या साहाय्यतेच्या पहिल्या फेरीत 9 हजार टन तांदूळ, 200 टन दुधाची भुकटी, 24 टन जीवबचाव औषधे असा साधारणपणे 45 कोटी रुपयांचा ऐवज असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. रविवारपर्यंत आणखी मदत पोहोचण्याची शक्मयता आहे.

विश्व समुदायाकडे मागणी

श्रीलंकेच्या प्रशासनाने विश्व समुदायाकडे साहाय्याची मागणी केली आहे. लवकर अन्नधान्यांची मदत न पोहोचल्यास नागरिकांवर उपाशी मरण्याची वेळ येईल, असा निर्वाणीचा इशारा रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातील अधिकाऱयांनी दिला. श्रीलंकेला तातडीने तांदूळ आणि भाजीपाल्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. सर्वप्रथम भारताकडून साहाय्यता पोहोचली आहे.

Related Stories

सिंगापूरने दिली फायझरच्या पॅक्सलोविड गोळीला मंजुरी

Patil_p

पाण्यावर चालण्यासाठी पैसे मोजताहेत लोक

Patil_p

रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस 95 टक्के प्रभावी

datta jadhav

इम्रान खान यांनी 31 जानेवारीपर्यंत सत्ता सोडावी; अन्यथा…

datta jadhav

रशियाची महिला स्नायपर युक्रेनच्या ताब्यात

Patil_p

धरणावर हल्ला, पुराचा धोका

Omkar B
error: Content is protected !!