वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश)
देशातील दुधाचे उत्पादन पुढील 25 वर्षांत तिप्पट होऊन 62.8 कोटी टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि सरासरी वार्षिक त्यात 4.5 टक्के वाढ होईल अशी माहिती अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी दिली.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ)चे व्यवस्थापकीय संचालक, जे अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करतात ते, म्हणाले की 2021 मध्ये देशाचे दूध उत्पादन 21 कोटी टन राहिले आहे.
याचदरम्यान ‘भारतातील दुग्ध उत्पादन 62.8 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि पुढील 25 वर्षांत त्यात आणखी 4.5 टक्के वाढ होईल, असे त्यांनी डेअरी क्षेत्राच्या परिस्थितीवर भाष्य करताना स्पष्ट केले आहे. इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे आयोजित इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट 2022 मध्ये सोधी यांनी ही माहिती दिली.
आगामी काळात मागणी-निर्यात वाढणार
येत्या 25 वर्षांत जागतिक उत्पादनात भारताचा वाटा जवळपास 23 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. सोढी म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे मागणीही वाढणार आहे. पुढील 25 वर्षांत दुधाची मागणी 51.7 कोटी टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून, ज्यामुळे 11.1 कोटी टन दुधाची निर्यात वाढेल.
जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की भारतातील दुधाची दरडोई उपलब्धता पुढील 25 वर्षांत 852 ग्रॅम प्रतिदिन होईल, जी 2021 मध्ये 428 ग्रॅम प्रतिदिन होती.
पुरवठा साखळी मजबूत
भारताची दुग्धव्यवसाय क्षेत्रात जगातील सर्वात कार्यक्षम पुरवठा साखळी आहे. ग्राहकांना दुधाचा पुरवठा करण्यासाठी पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च जागतिक सरासरीच्या तुलनेत खूपच कमी आहे, असे सोधी म्हणाले.