Tarun Bharat

भारताचा मालदीववर एकतर्फी विजय

Advertisements

यू-17 आशियाई चषक क्वॉलिफायर स्पर्धा

अल खोबर-सौदी अरेबिया / वृत्तसंस्था

एएफसी यू-17 आशियाई चषक 2023 पात्रता स्पर्धेत भारताने मालदीवचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. प्रिन्स सौद बिन जलावी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार व्हॅनलालपेका गुईते, फनाई, बॉबी सिंग, फिनीक्स ओयनम यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला.

लेफ्ट फ्लँकमध्ये हुझाफह व बॉबी यांनी मालदीव संघाविरुद्ध सातत्याने आक्रमणे केली. पहिल्या सत्रात नवव्या मिनिटाला गुईतेची संधी हुकली असली तरी पहिला गोल त्यानेच केला. फनाईने 24 व्या मिनिटाला संघाची आघाडी डबल केली. ब्रेकनंतरही भारताचाच वरचष्मा राहिला आणि आणखी 3 गोलसह त्यांनी 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

Related Stories

आयर्लंडचा झिम्बाब्वेवर मालिका विजय

Patil_p

सर्व क्रिकेट प्रकारातून पार्थिव पटेल निवृत्त

Omkar B

आस्ट्रेलियाचा मालिकाविजय

Patil_p

भारताचा स्वप्नभंग, बेल्जियम अंतिम फेरीत

Patil_p

2020 आयपीएलचे वेळापत्रक

Patil_p

केटी लेडेकीचा सुवर्णपदक

Patil_p
error: Content is protected !!