वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये सुरू असलेल्या सॅफ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत शनिवारी काटमांडूच्या दशरथ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाने मालदीवचा 9-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत आता भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाने दोन सामन्यातून 6 गुण घेत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. शनिवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघातील अंजू तेमांगचा खेळ दर्जेदार झाला. तिने या सामन्यात 4 गोल नेंदविले. डांगमेई ग्रेसने दोन गोल तसेच प्रियांका देवी, सौम्या गुगुलोत आणि कश्मीना यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत भारताला चार कॉर्नर्स मिळाले होते. या स्पर्धेत भारताचा त्यांच्या गटातील शेवटचा प्राथमिक सामना 12 सप्टेंबरला बांगलादेशबरोबर होणार आहे.