नवी दिल्ली
चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्रातील कामगिरीचा विकास दर 12 वर्षांच्या उच्चांकावर राहिला आहे. या संदर्भातील आकडेवारी शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणातून देण्यात आली आहे. उत्पादनात वाढ आणि खर्चात घट यामुळे देशाच्या सेवा क्षेत्राची कामगिरी गेल्या महिन्यात उत्कृष्ट राहिली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
एस अॅण्ड पी सेवा पीएमआयचा निर्देशांक फेब्रुवारीमध्ये 59.4वर पोहोचला आहे. हा आकडा जानेवारीत 57.2 वर राहिला होता. सेवा क्षेत्रातील पीएमआय सलग सलग 19व्या महिन्यात 50 अंकांच्या वर राहिला आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स भाषेत, 50 वरील संख्या क्षेत्राचा विस्तार दर्शवते, तर 50 पेक्षा कमी संख्या म्हणजे आकुंचन दाखविते. पीएमआय आउटपुट निर्देशांक फेब्रुवारीमध्ये 59 वर पोहोचला आहे.