व्यावसायिक निर्यातीमध्येही वाढीची नोंद : आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती सादर
नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 23 मध्ये भारताची सेवा निर्यात 26.6 टक्क्यांनी वाढून 322 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यासह व्यावसायिक निर्यात आणि सेवा निर्यात यातील अंतर कमी झाले आहे. या कालावधीत व्यावसायिक निर्यात केवळ 6 टक्क्यांनी वाढून 447 अब्ज डॉलर झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)च्या ताज्या आकडेवारीनुसार, देण्यात आली आहे.
दुसरीकडे, सेवांची आयात 22.2 टक्क्यांनी वाढून 179.7 अब्ज डॉलर झाली आहे. हे 142.5 अब्ज डॉलर इतका सेवा व्यापार अधिशेषामुळे आहे. या आर्थिक वर्षात व्यावसायिक व्यापार तूट 267 अब्ज डॉलर होती. यामुळे आर्थिक वर्ष 23 मध्ये देशाची एकूण व्यापार तूट 124.5 अब्ज डॉलर झाली आहे.
भारताची सेवा निर्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) पासून डॉक्टर आणि परिचारिकांनी परदेशात प्रदान केलेल्या सेवांपर्यंत आहे. आरबीआय बँक सेवांच्या निर्यातीवरील मासिक डाटा जारी करत नाही आणि आता प्रत्येक तिमाहीत त्याचे वर्गीकरण केले जाते, ज्यात वाहतूक, प्रवास, बांधकाम, विमा आणि पेन्शन, वित्तीय सेवा, दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा, वैयक्तिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन सेवा आणि इतर व्यापार यांचा समावेश होतो.
सॉफ्टवेअरची निर्यात महत्वाची भारताच्या सेवा निर्यातीत सॉफ्टवेअरची निर्यात महत्त्वाची असताना, इतर व्यवसाय सेवांअंतर्गत सेवा वेगाने वाढल्या आहेत आणि आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या 9 महिन्यांत एकूण सेवा निर्यातीत त्यांचा वाटा 24 टक्के झाला आहे, जो पूर्वी 19 टक्के होता.