नवी दिल्ली : सरकार जून महिन्याच्या सुरुवातीला 5-जी नेटवर्कच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. दूरसंचार विभाग यासंदर्भात लिलाव वेळेत व्हावा यासाठी योग्य ती प्रक्रिया राबवत असून यामध्ये स्पेक्ट्रम मूल्य निश्चित करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. काहीही झालं तरी लिलाव प्रक्रिया जूनमध्येच होण्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
ट्रायची शिफारस
देशामध्ये 5-जी सेवा लागू करण्यासाठी 30 वर्षांपेक्षा अधिकच्या कालावधीसाठी विविध बँडमध्ये 7.5 लाख कोटीपेक्षा अधिकच्या किमतीच्या स्पेक्ट्रमच्या लिलावाची शिफारस करण्यात आल्याचे यावेळी ट्रायने सांगितले आहे. नियामकाने मोबाईल सेवांसाठी स्पेक्ट्रम विक्रीसाठी याआधी जी किंमत ठरवली होती त्यापेक्षा 39 टक्के दर कमी केले असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे.