Tarun Bharat

राष्ट्रवादी-सेनेचे युतीचे संकेत, कोल्हापूर महापालिकेत एकत्र येण्याची शक्यता

स्थानी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युतीचे संकेत

कोल्हापूर; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता आहे असे संकेत आता मिळाले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. हि युती झाली तर कोल्हापूर महापालिकेमधील राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची जवळीकता वाढलीआहे. केंद्राकडून सुरू असणाऱ्या कारवाई बाबत महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना या कारवाईविरोधात धीराने लढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आता राष्ट्रवादीकडे एक जवळचा मित्र म्हणून पाहत आहे. भविष्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याचे संकेत आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे.

…तर कोल्हापुरात ही एकत्र लढतील

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात युतीचे संकेत मिळत आहेत. ही युती झाली तर येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढवू शकते.

Related Stories

गांधीनगरमधून तामिळनाडूच्या व्यापाऱ्याचे पाच लाख लंपास

Archana Banage

महाबळेश्वर पालिका विरोधकांची प्रेस

Patil_p

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 702 वर

Tousif Mujawar

पॉवर लिफ्टिंग शुभांगी पाटीलला मदतीची गरज

Archana Banage

”स्वामीनिष्ठेसाठी बलात्कारासारख्या विषयाचे भांडवल करणं निंदनीय”

Archana Banage

टोळधाड : पुढील चार आठवडे भारताला अतिदक्षतेचा इशारा

datta jadhav