Tarun Bharat

चीन सीमेवर भारत-अमेरिकेचा युद्धाभ्यास

एलएसीवर रशियन हेलिकॉप्टरने पोहोचले दोन्ही देशांचे सैनिक

@ वृत्तसंस्था / देहरादून

उत्तराखंडच्या औलीमध्ये चीन सीमेनजीक भारत आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यान युद्धाभ्यास सुरू आहे. विशेष म्हणजे या युद्धाभ्यासात रशियाकडून निर्मित हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही देशांचे सैनिक एमआय-17व्ही-5 हेलिकॉप्टरद्वारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पोहोचले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील हा युद्धाभ्यास 15 नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून तो 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. औली हे ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे. या युद्धाभ्यासादरम्यान पर्वतीय अन् अत्यंत थंड भागांमध्ये इंटीग्रेटेड बॅटल ग्रूप्सची क्षमता पडताळून पाहिली जाणार आहे. हा युद्धाभ्यास दरवर्षी आयोजित होतो, मागील वर्षी या युद्धाभ्यासाचे आयोजन अमेरिकेच्या अलास्का येथे झाले होते.

महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास

उत्तराखंडला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱयात झालेल्या हिंसक झटापटीनंतर या भागात चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. याचमुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान होणाऱया या युद्धाभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऑस्ट्रेलियासोबत इन्प्रंट्री युद्धाभ्यास

भारत आता ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण संबंध मजबूत करत आहे. दोन्ही देशांचे सैन्य 28 नोव्हेंबरपासून 11 डिसेंबरपर्यंत ‘ऑस्ट्रा-हिंद’ इन्प्रंटी कॉम्बॅट एक्सरसाइज करणार आहे. या युद्धाभ्यासामुळे निमवाळवंटी क्षेत्रात मोहीम राबविण्याची क्षमता वाढणार असल्याचे सैन्याच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.

Related Stories

राज्यांना दक्षतेचे आवाहन

Amit Kulkarni

प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगिती

Patil_p

दैनंदिन रुग्णसंख्या दीड लाखांवर

datta jadhav

संजदच्या अध्यक्षपदी ललन सिंग

Patil_p

डान्स व्हिडिओंमुळे होतेय लाखोंची कमाई

Patil_p

दोन चकमकींमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p