Tarun Bharat

जकार्तामध्ये इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग

ऑनलाईन टीम/तरुण भारत

इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) बुधवारी (१९ ऑक्टोबर) इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत मशिदीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीनंतर मशिदीवरील भव्य घुमटही कोसळला आहे. यामध्ये मशीद मीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती इंडोनेशियातील जकार्ता पोलिसांनी दिली आहे.( Indonesia: Jami mosque of Jakarta catches fire, dome collapses)

स्‍थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर मशिदीला लागलेली आग इतकी भयानक होती की त्यामुळं मशिदीवरील घुमट पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. काही दिवसांपूर्वीच या मशिदीच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर ही आग लागली आहे. मशिदीला आग कशामुळं लागली किंवा त्यामागं नेमकी काय कारणं आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी मशिदीच्या घुमटाचं काम करणाऱ्या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, इस्लामिक सेंटर परिसरातील मशिदीला आग लागल्यानंतर प्रशासनानं तातडीनं मशिदीतील भाविकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मशिदीतील सर्व लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून या दुर्घटनेत मात्र मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळं या घटनेनं इंडोनेशियात खळबळ उडाली आहे.

Related Stories

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

Archana Banage

गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांची उच्च न्यायालयात धाव; हेतुपुरस्पर कारवाईचा आरोप

datta jadhav

कोल्हापूरात काळजाचा ठोका चुकला! शिवशाहीचा ब्रेकफेल

Archana Banage

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू ची राज्यात चर्चा …    

Kalyani Amanagi

उत्तराखंड : भाजप आमदार विनोद चमोली कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका

Archana Banage