Tarun Bharat

महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंडोनेशिया पात्र

वृत्तसंस्था /जकार्ता

पुढील वषी होणाऱया आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंडोनेशियाच्या महिला संघाने आपले तिकिट आरक्षित केले आहे. सदर स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळविली जाणार असून पहिल्यांदाच आयसीसीने महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

पात्रता स्पर्धेतील सामन्यात इंडोनेशियाने पापुआ न्यू गिनियाचा थरारक पराभव करत आगामी 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात पापुआ न्यू गिनियाला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ 2 धावांची जरुरी होती. हे शेवटचे षटक इंडोनेशियाची 18 वषीय गोलंदाज कुर्नियारतिनीने टाकले. या षटकात तिने पहिल्या दोन चेंडूंवर पापुआ न्यू गिनियाचे 2 गडी बाद केले. या कामगिरीबद्दल इंडोनेशियाची कर्णधार वेसीकरत्नादेवीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.

या पात्रफेरीच्या स्पर्धेत पापुआ न्यू गिनियाची डिका लोहियाने सर्वोत्तम गोलंदाज आणि स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. तिने या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात 8 धावात 5 गडी बाद केले. तसेच तिने फलंदाजी करताना नाबाद 25 धावा जमविल्या. इंडोनेशियामध्ये आता क्रिकेटचा प्रसार झपाटय़ाने होईल, अशी आशा क्रिकेट इंडोनेशियाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. क्रिकेट इंडोनेशियाचे प्रमुख अभिरामसिंग यादव यांनी आपल्या संघाचे कौतुक केले आहे.

Related Stories

भारतीय महिला फुटबॉल संघ जाहीर

Amit Kulkarni

सैनीच्या दुखापतीची तपासणी

Patil_p

अर्जेन्टिना-फ्रान्स आज जेतेपदाची लढत

Patil_p

युक्रेनच्या स्विटोलिनाचा रशियन खेळाडूवर विजय

Patil_p

नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी व्हीव्हीएस लक्ष्मण- गांगुली

Patil_p

अमित पांघलला कांस्यपदक

Patil_p