‘कॅम्पस आर्किटेक्चर ऍण्ड डिझाईन’ क्रमवारीत दुसरा क्रमांक
प्रतिनिधी/ बेळगाव
एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या संस्थेच्या इंटरनॅशनल डे कम बोर्डिंग स्कूल क्रमवारीत बेळगावच्या इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलला टॉप टेनमध्ये स्थान दिले आहे. या क्रमवारीत इंडस स्कूलला दहावा क्रमांक तसेच ‘कॅम्पस आर्किटेक्चर ऍण्ड डिझाईन’ क्रमवारीत इंडस अल्टमला दुसरा क्रमांक मिळाला. गुरगांव येथे ‘द लीला ऍम्बीयन्स हॉटेल’मध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलला गौरविण्यात आले.
शाळेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी यांच्यावतीने शाळेचे कार्यकारी संचालक व सीईओ लेफ्टनंट जनरल अर्जुन रे (पीव्हीएसएम) (व्हीएसएम निवृत्त), प्राचार्या सरोजिनी राव व इंडस ट्रस्टचे संचालक कर्नल सत्या राव (निवृत्त) यांनी हा गौरव स्वीकारला. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत इंडस इंटरनॅशनल शाळेला असा गौरव प्राप्त होणे ही अभिमानाची बाब आहे.
टॉप टेनमध्ये गौरविली जाणारी बेळगावमधील ही आमची पहिली शाळा आहे. हे यश म्हणजे सर्वांच्या सांघिकतेचे फलित आहे. पुढील वषी याहून वरच्या क्रमवारीत शाळेचा क्रमांक लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे डॉ. प्रसिद्धा श्रीकुमार यांनी नमूद केले.
इंडस अल्टम इंटरनॅशनल ही शाळा पेंब्रिजच्या धर्तीवर बेळगावमध्ये कार्यरत असून भारतीय संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यावर भर देऊन विद्यार्थी घडवत आहे. त्यामुळेच या शाळेकडे विद्यार्थी व पालक आकर्षित होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.