वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खाण आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जून महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनात 4.2 टक्के वाढ झाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. गेल्यावषी जूनमध्ये औद्योगिक उत्पादन वाढीचा दर चार टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार, जून महिन्यात उत्पादन क्षेत्राचा विकास दर 2.6 टक्के होता, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 3.5 टक्के होता. समीक्षाधीन कालावधीत, खाण क्षेत्राचा विकास दर 10.3 टक्के होता, तर ऊर्जा क्षेत्राचा विकास दर 8.6 टक्के होता. यासोबतच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा दर 5.2 टक्के होता. हा दर गेल्यावषीच्या याच तिमाहीत 4.7 टक्क्मयांपेक्षा जास्त नोंद झाला होता.