प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागातर्फे इंडस्ट्री एक्स्पर्ट टॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘कंपनी लॉ’ या विषयावर सीए पुष्कर ओगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सीए ओगले यांनी कंपनी लॉ याविषयी सविस्तर माहिती देत तांत्रिक व कायदेशीर बाबींची माहिती करून दिली. व्यवसाय करताना कंपनी लॉ किती महत्त्वाचा असतो, हे त्यांनी पटवून दिले. एमबीए विभागप्रमुख डॉ. के. एस. एल. दास यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित चाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन प्रमोद कठवी, प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी सहकार्य
केले.